शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

शहराला आणखीन २०० शहर बस मिळणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:15 IST

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या शहरात १०० बसेस नागरिकांना सेवा देत आहेत. शहरासाठी आणखी २०० बस मिळण्याची शक्यता ...

औरंगाबाद : स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सध्या शहरात १०० बसेस नागरिकांना सेवा देत आहेत. शहरासाठी आणखी २०० बस मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्र शासनाने सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणखी मजबूत करण्यासाठी नवीन योजना तयार केली आहे. या योजनेतून शहराला मदत मिळणार असून, यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून सुरु आहे.

शहरात स्मार्ट सिटीच्या माध्यमातून बससेवा सुरु केली आहे. सध्या शंभर बस या माध्यमातून चालवल्या जातात. केंद्र शासनाने आणखीन दोनशे बसबद्दल नवीन योजना तयार केली आहे. या योजनेच्या माध्यमातून औरंगाबाद शहरासाठी आणखी दोनशे बस प्राप्त होऊ शकतील, अशी माहिती पालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिली. यासाठीचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरु असल्याचे त्यांनी सांगितले. औरंगाबादचा दोनशे बसचा प्रस्ताव केंद्र शासनाने मंजूर करावा, यासाठी खासदार डॉ. इम्तियाज जलील व भागवत कराड यांचीदेखील मदत घ्यावी लागणार आहे, असे ते म्हणाले. स्मार्ट सिटीमधील बससेवा दहा वर्ष सुरू राहील, यादृष्टीने नियोजन केलेले आहे. केंद्र शासनाकडून भविष्यात आणखी २०० बसेस मिळाल्या तर वीस वर्षे या सेवेकडे बघण्याची गरज राहणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.