पाण्यासाठी शहर व्याकुळ

By Admin | Updated: September 15, 2014 00:57 IST2014-09-15T00:53:42+5:302014-09-15T00:57:09+5:30

औरंगाबाद : सणासुदीच्या काळात शहर पाण्यासाठी व्याकूळ आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. प्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे.

The city is disturbed for water | पाण्यासाठी शहर व्याकुळ

पाण्यासाठी शहर व्याकुळ


औरंगाबाद : सणासुदीच्या काळात शहर पाण्यासाठी व्याकूळ आहे. अनेक भागांमध्ये पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. प्रत्येक नागरिकाच्या ५७ लिटर पाण्याची चोरी होत आहे. जायकवाडीतून १४७ एमएलडी पाणी उपसले जाते.
शहराला १२० एमएलडी पाणी येते. रोज ३० एमएलडी पाण्याची चोरी होत आहे. शहराची लोकसंख्या १३ लाख आहे. दरडोई १३५ लिटर पाणीपुरवठा होणे गरजेचे आहे. मनपाने १ सप्टेंबरपर्यंत ७८ लिटर पाणी दरडोई पुरविले. १ सप्टेंबरपासून औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनीकडे पाणीपुरवठ्याची जबाबदारी आहे. वर्षाला दरडोई १४ हजार लिटर पाणी पालिका देते. पाणीपट्टी ३६५ दिवसांची वसूल केली जाते. पाणीपुरवठा १२० दिवसच होतो आहे.
२० कोटींचा चुराडा...
जुनी जायकवाडी योजना १९७५ पासून कार्यरत आहे. तिची क्षमता ५६ दशलक्ष लि. आहे. नवीन योजना १९९२-९३ पासून कार्यान्वित आहे. तिची क्षमता १०० दशलक्ष लिटर इतकी आहे.
जायकवाडी मुख्य योजनेवर २००९ ते २०१४ पर्यंत ३ कोटी ४८ लाख ६६ हजार इतका देखभालीवर खर्च झाला. शहरातील वितरण व्यवस्थेवर याच काळात १४ कोटी ८८ लाख ६९ हजार रुपये खर्च झाला. तर १४ कोटी रुपयांचा खर्च नवीन जलवाहिन्यांवर झाला आहे.

Web Title: The city is disturbed for water