शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

शहर बससेवेला कंत्राटदार मिळेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2017 00:53 IST

नांदेड: शहर बससेवा चालविण्यास एसटी महामंडळ अपयशी ठरल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही सेवा खाजगी कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शहर बससेवा चालविण्यास एसटी महामंडळ अपयशी ठरल्यानंतर आता महापालिका प्रशासनाने ही सेवा खाजगी कंपनीकडे देण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. यासाठी काढलेल्या निविदेची मुदत संपली,परंतु एकही कंत्राटदार ही सेवा चालविण्यासाठी पुढे आला नाही़ मराठवाड्यातील झपाट्याने वाढ होणाऱ्या शहरामध्ये क्रमांक दोनचे शहर म्हणून नांदेडची ओळख आहे़ शिक्षण आणि आरोग्य सेवा देणाऱ्या शहरात दररोज हजारो लोक येतात़ आजघडीला शहराची लोकसंख्या आठ लाखांच्या घरात आहे़ यामध्ये शिक्षण, व्यवसाय आणि उद्योगासाठी राहणारी बहुतांश मंडळी वाहतुकीसाठी आॅटो, शहर बसेसचा वापर करतात़ खाजगी कंपन्या, उद्योग हे सर्वाधिक सिडको, हडको, कृष्णूर भागात आहेत़ तर शैक्षणिक सुविधा विष्णूपुरी परिसर आणि शहराच्या मध्यवर्ती भागात आहेत़ शहरातील नागरिकांनी बससेवा देण्याची जबाबदारी महापालिकेची असून यापूर्वी भागीदारी तत्त्वावर अकोला येथील खाजगी कंपनीकडे कंत्राट दिले होते़ त्यांच्यामार्फत ही सेवा सुरु होती़ मनपा आणि कंत्राटदारासोबत झालेल्या वादानंतर ही सेवा एसटी महामंडळाकडे देण्यात आली़ आॅक्टोबर २०१० मध्ये जवाहरलाल नेहरू नागरी पुनर्निर्माण अभियानांतर्गत महापालिकेस मिळालेल्या ३० बसेस एसटीकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या़ यामध्ये १० मोठ्या आणि २० लहान बसेसचा समावेश होता़ सेंसर आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या बसेस नांदेडकरांना सेवा देत होत्या़ नवीन गाड्यांमुळे नांदेडकरांनी बससेवेला चांगला प्रतिसाद दिला़ महामंडळाला उत्पन्नही चांगले मिळाले होते़, परंतु बसमधील तांत्रिक बिघाडामुळे अल्पावधीतच ही सेवा कोलमडली़ तोट्यात सुरु असलेली ही सेवा आता अखेरच्या घटका मोजत आहे़ त्यामुळे मनपाने ही सेवा पुन्हा एकदा नव्या जोमाने सुरु करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत़,परंतु ही सेवा चालविण्यासाठी सद्य:स्थितीत एकही कंत्राटदार पुढे आला नाही, हे विशेष!