शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोत पुन्हा पाणीटंचाई तीव्र

By admin | Updated: June 10, 2014 01:00 IST

औरंगाबाद : सिडको- हडकोतील वसाहतींचा पाणीपुरवठा पुन्हा कोलमडला आहे. काल ८ जून रोजीचा पाणीपुरवठा ९ जूनच्या दुपारपर्यंत सुरळीत झालेला नव्हता.

औरंगाबाद : सिडको- हडकोतील वसाहतींचा पाणीपुरवठा पुन्हा कोलमडला आहे. काल ८ जून रोजीचा पाणीपुरवठा ९ जूनच्या दुपारपर्यंत सुरळीत झालेला नव्हता. त्यामुळे संतप्त नगरसेवकांनी पालिकेच्या अभियंत्यांना विचारणा केली. सिडको- हडकोसाठी टाकण्यात आलेल्या एक्स्प्रेस जलवाहिनीवर ६ ठिकाणी बायपास आहे.
मागील दीड महिन्यापासून सातत्याने सिडको- हडकोतील २२ वॉर्डांचा पाणीपुरवठा कोलमडतो आहे. त्यामागील कारणे शोधण्याऐवजी मनपा सत्ताधारी व अधिकारी बैठकींच्या सत्रात जुंपले आहेत.
पाण्याची गळती, चोरी, महावितरणचा लपंडाव, अशी काही कारणे सांगून मागील महिन्यापासून पालिका वेळकाढू धोरण अवलंबित आहे. मात्र, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. नगरसेविका ऊर्मिला चित्ते यांनी आठ तासांच्या गॅपने पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप केला. यांत्रिकी विभागाचे उपअभियंता यू.जी. शिरसाठ म्हणाले की, आज महावितरणकडून काहीही अडचण आली नाही. सुरळीत पाणीपुरवठा झालेला आहे.
सहा ठिकाणी राजकीय बायपास
एक्स्प्रेस जलवाहिनी सिडको- हडकोसाठी टाकण्यात आली असली तरी तिला सहा ठिकाणी बायपास करण्यात आले आहे. सूतगिरणी, गजानन महाराज मंदिर, सेव्हन हिल जलकुंभ, मरीमाता, शिवाजीनगर या ठिकाणांहून त्या जलवाहिनीतील पाणी दुसरीकडे पुरविले जाते. वसाहती वाढल्यामुळे राजकीय बायपास करून पाणी वळविले गेले. त्यामुळे सिडको- हडकोला पाणी कमी पडत असल्याचा आरोप होत आहे.
शिक्षणमंत्र्यांकडून कानउघाडणी
शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी आज मनपा आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे आणि शहर अभियंता एस.डी. पानझडे यांची पाणीपुरवठ्यावरून जोरदार कानउघाडणी केली. ३ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा शब्द डॉ. कांबळे, पानझडे यांनी शिक्षणमंत्र्यांना दिला. काही वॉर्डांमध्ये भरमसाट पाणीपुरवठा होतो आहे, तर कुठे पाण्यासाठी आठ-आठ दिवस वाट पाहावी लागत आहे. ‘जिसकी लाठी, उसकी भैस’ अशा पद्धतीने मनपाचा कारभार सुरू आहे. रोशनगेट, जिन्सी, गारखेडा, सिडको- हडको या वसाहतींमध्येच अडचणी निर्माण का होत आहेत, महावितरणचे कारण सांगितले जात आहे, अचानक अडचणी येण्यामागचे कारण काय? असा सवालही शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शहर अभियंत्यांना केला.
एक्स्प्रेस जलवाहिनीच्या हेतूला ‘छेद’
२००१ साली सिडको- हडकोतील सुमारे २५ हजार नळधारकांसाठी १,२०० मि.मी. व्यासाची एक्स्प्रेस जलवाहिनी टाकण्यात आली. ती जलवाहिनी सिडकोतील वाढत्या लोकसंख्येला समोर ठेवून टाकण्यात आली होती. त्या जलवाहिनीचे पाणी सध्या कमी पडते आहे.
२२ वॉर्डांतील लोकसंख्या १४ वर्षांत मोठ्या प्रमाणात वाढल्याने सिडको- हडकोची तहान वाढली आहे. पालिकेकडे आहे तीच यंत्रणा असल्यामुळे हा सगळा त्रास होत असल्याचे दिसते.