शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

अर्धापूर नगराध्यक्षपदासाठी चुरस

By admin | Updated: May 30, 2014 00:29 IST

अर्धापूर : अर्धापूर नगर पंचायतीत खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण झालेल्या नगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे़

 अर्धापूर : भोकर मतदारसंघात क्रमांक एकवर असलेल्या अर्धापूर ग्रामपंचायतचे डिसेंबर २०११ मध्ये नगर पंचायतीत रुपांतर झाले़ सर्वसाधाण महिलेसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्षपदाचा अडीच वर्षाचा कार्यकाळ एक महिन्यात संपणार असून आगामी खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण झालेल्या नगराध्यक्षपदासाठी चुरस निर्माण झाली आहे़ डिसेंबर २०११ मध्ये पार पडलेल्या नगरपंचायतच्या सार्वत्रिक निवडणुकीत १७ जागांपैकी ३ जागा राष्ट्रवादी काँग्रेस व उर्वरित १४ जागा काँग्रेसने जिंकून नगर पंचायतीत निर्विवाद बहुमत पटकावले़ त्यानुसार प्रथम नगराध्यक्षाचा मान रेखाताई काकडे यांनी मिळविला़ तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी त्यांच्या मतदारसंघातील या नगरपंचायतीसाठी कोट्यवधी रुपयाचा निधी दिला़ पण नगरसेवकांमध्ये ग्रामपंचायत स्तरावरील काम करण्याची मानसिकता बदलण्यास बराच वेळ लागला़ तसेच नियोजनअभावी रेखाताई काकडे यांना आपल्या अडीच वर्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या कारकिर्दीत आपला ठसा कायम राहील असे कोणतेही काम केले नसल्याचा आरोप होतो़ आजपर्यंत अर्धापूरच्या राजकारणात ग्रा़पं़ पासून सरपंच हिंदू धर्माचा असेल तर उपसरपंच मुस्लिम धर्माला, सरपंच सरपंच मुस्लिम धर्माचा असेल तर उपसरपंच हिंदू धर्माला देवून सर्वच गटाच्या नागरिकांनी सामाजिक एकात्मता जोपासली़ त्या अनुषंगाने प्रथम नगराध्यक्षपदी रेखाताई काकडे यांची निवड झाली़ तर उपनगराध्यक्षपदी मिर्झा अखतरउल्ला बेग यांची निवड झाली़ आगामी नगराध्यक्ष पदासाठी व्यंकटेश उर्फ राजू शेट्टे, बांधकाम समिती सभापती नासेरखान पठाण व अ़ मुसव्वीर खतीब हे तिघेजण शर्यतीत आहेत़ नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत शहरात पडलेले मतदान व आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पक्षश्रेष्ठी नगराध्यक्षपदी कोणाची निवड करेल, याकडे संपूर्ण भोकर मतदारसंघाचे लक्ष लागले आहे़ (वार्ताहर) १७ पैकी ९ सदस्य महिला आहेत़ नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे़ पहिल्या टप्प्यात महिलेला नगराध्यक्षपदी संधी देण्यात आली़ म्हणून उत्तरार्धात पुरूष सदस्यास नगराध्यक्षपदी प्राधान्य देण्यात येणार असल्याचे समजते़ सुरुवातीला पुरेसा कर्मचारी वर्ग नव्हता़ मुख्याधिकारी नव्हते़ या अडचणीमुळे काही काम करता आले नाही़ पण श्रेष्ठींनी एकवार परत संधी दिल्यास नगराध्यक्षपदासाठी मी इच्छुक आहे - रेखाताई काकडे, नगराध्यक्षा सर्वसामान्य नागरिकांची कामे करणारा सक्षम नगराध्यक्ष निवडावा - संतोष कल्याणकर, नागरिक केवळ नावासाठी नगराध्यक्ष पद न भूषविता जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी वेळ देणारा नगराध्यक्ष निवडा - शेख शबाना, सामाजिक कार्यकर्ती, अर्धापूर