शाळा स्वच्छतागृहांच्या बांधकामाची तपासणी

By Admin | Updated: July 12, 2015 00:17 IST2015-07-12T00:08:36+5:302015-07-12T00:17:02+5:30

बीड : जिल्हा परिषद शाळांमध्ये बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या तपासणीसाठी दिल्ली येथील निती आयोगाचे अधिकारी बीडमुक्कामी आहेत.

Check out the construction of school buildings | शाळा स्वच्छतागृहांच्या बांधकामाची तपासणी

शाळा स्वच्छतागृहांच्या बांधकामाची तपासणी


बीड : जिल्हा परिषद शाळांमध्ये बांधण्यात येत असलेल्या स्वच्छतागृहांच्या बांधकामाच्या तपासणीसाठी दिल्ली येथील निती आयोगाचे अधिकारी बीडमुक्कामी आहेत. प्रत्येक तालुक्यात जाऊन बांधकामाची पाहणी सुरु आहे.
जिल्ह्यात २०१२- १३ मध्ये जि.प. शाळांसाठी मंजूर झालेल्या शौचालयांपैकी ७३२ शौचालयांची कामे रखडली होती. या शौचालयांसाठी प्रत्येकी एक लाख रुपये इतका निधी मंजूर आहे. रखडलेली कामे अंतिम टप्प्यात असून ६०० शौचालयांची कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित १०० शौचालयांची कामे देखील सुरु आहेत. दरम्यान, चालू वर्षी २९३ शौचालये मंजूर करण्यात आलेली आहेत. त्यासाठी प्रत्येकी दीड लाख रुपये याप्रमाणे चार कोटी ३९ लाख ५० हजार रुपये इतका निधी प्राप्त झाला आहे. २९३ स्वच्छतागृहांची कामे देखील वेगाने सुरु आहेत.
दरम्यान, दिल्लीतील निती आयोगाचे संशोधन अधिकारी आर. एन. मुंडे हे चार दिवसांपासून बीडमध्ये आहेत. त्यांनी आतापर्यंत पाटोदा, बीड, आष्टी, धारुर, केज, अंबाजोगाई या तालुक्यांत जाऊन स्वच्छतागृहांच्या बांधकामांची पाहणी केली आहे. उर्वरित तालुक्यांमध्येही ते जाणार आहेत. सर्व शिक्षा अभियानचे उपशिक्षणाधिकारी हिरालाल कराड, कार्यकारी अभियंता सय्यद बाखी हे त्यांच्यासोबत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Check out the construction of school buildings