शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

महाबीजकडून स्वस्त बियाणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2017 00:51 IST

रबी हंगामासाठी महाबीजकडून अनुदानित हरभरा बियाण्यांचे दर प्रति किलो २५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : रबी हंगामासाठी महाबीजकडून अनुदानित हरभरा बियाण्यांचे दर प्रति किलो २५ रुपयांनी कमी करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सरासरी एक लाख हेक्टरवर हरभरा लागवडीचे नियोजन असून, त्यासाठी चार हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.यंदा खरीप हंगामात असमाधानकारक पाऊस झाल्यामुळे मूग, उडीद व सोयाबीन उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या आशा आता रब्बी हंगामातील हरभरा, गहू, ज्वारी, करडई या पिकांवर आहेत. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत जालना जिल्ह्यात हरभरा उत्पादन वाढीस प्राधान्य देण्याचे नियोजन कृषी विभागाने केले आहे. महाबीजकडून शेतकºयांना अनुदावर उपलब्ध करून देण्यात येणाºया अनुदानित हरभरा बियाण्याचे दर कमी करण्यात आले आहेत.गत वर्षी नऊ हजार रुपये क्विंटल दराने विक्री करण्यात आलेल्या देशी हरभरा वाणाची किमंत अडीच हजारांनी कमी करण्यात आली आहे. तर काबली हरभºयाचे दर बारा हजा रुपये क्ंिवटलवरून साडेनऊ हजार रुपये करण्यात आले आहेत. देशी वाणामध्ये उपलब्ध जॅकी, दिग्विजय तर काबली वाणामध्ये विराट, कॉक -२ या नावाने उपलब्ध हरभरा बियाणे शेतकºयांना २० ते ३० किलोच्या बॅगमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. हे अनुदानित बियाणे खरेदी केल्यानंतर शेतकºयांना एका बॅगमागे चारशे ते साडेचारशे रुपयांचा फायदा होणार आहे. रब्बी हंगामासाठी हरभरा, गहू, ज्वारी, करडईचे तीन लाख, ४६ क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्याचे नियोजन महाबीजने केले आहे.