शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
4
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
5
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
6
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
7
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
8
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
9
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
10
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
11
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
12
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
13
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
14
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
15
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
16
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
17
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
18
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
19
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
20
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
Daily Top 2Weekly Top 5

जागा बळकावण्यासाठी चौक नामकरणाचा फंडा

By admin | Updated: June 17, 2014 01:10 IST

वाळूज महानगर : वाळूज महानगरमध्ये कोणाचीही परवानगी न घेता चौकाचे नामकरण करण्याचे प्रमाण वाढले

वाळूज महानगर : वाळूज महानगरमध्ये कोणाचीही परवानगी न घेता चौकाचे नामकरण करण्याचे प्रमाण वाढले असून, या गंभीर अतिक्रमणांकडे स्थानिक ग्रामपंचायत, एमआयडीसी, सिडको व पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. जागा बळकावण्यासाठी व अतिक्रमण करण्यासाठी रात्रीतून नवनवीन चौकांची भर पडत आहे.वाळूज महानगरातील बजाजनगर, सिडको, साऊथ सिटी परिसर, पंढरपूर, वडगाव कोल्हाटी, रांजणगाव शेणपुंजी, जोगेश्वरी, कमळापूर, वाळूज, बकवालनगर आदी परिसरात मोक्याच्या भूखंडांवर तसेच रहदारीच्या ठिकाणी फलक लावून चौकाचे नामकरण होत आहे. कारवाई टाळण्यासाठी या चौकांना महापुरुषांचे, राजकीय पक्षाच्या नेत्याचे नाव दिले जात आहे. वास्तविक चौकाचे नामकरण करण्यासाठी ग्रामपंचायतने ठराव संमत करावा लागतो. नंतर एमआयडीसी, सिडको व पोलीस प्रशासनाची परवानगी घ्यावी लागते. या परिसरातील मुख्य बाजारपेठ, रस्ते व चौकांत असे अनधिकृतपणे नामकरणाचे फलक लावले जात आहेत. या प्रकरणी कारवाई होत नसल्यामुळे अतिक्रमणधारकांचे फावत आहे. याविषयी सरपंच छाया कारले, कांताबाई जाधव, योगेश दळवी, रंजना भोंड, लक्ष्मीबाई कोरडकर आदींशी संपर्क साधला असता त्यांनी ग्रामपंचायत हद्दीमध्ये चौकाचे नामकरण विनापरवाना होत असल्याचे मान्य केले.हा परिसर मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रात्रीतून चौकाचे नामकरण होते व चौकाची मोडतोड झाल्यास जातीय तेढ निर्माण होऊन शांतता भंग होण्याची शक्यता असते. ग्रामपंचायतीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे विनापरवाना चौकाचे नामकरण करणाऱ्यांच्या विरोधात कठोर कारवाई करणे शक्य होत नसल्याची हतबलता परिसरातील सरपंच मंडळींनी व्यक्त केली.कारवाई करण्यास टाळाटाळविनापरवाना व नियमबाह्यपणे होत असलेल्या चौकांच्या नामकरणाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एमआयडीसी, ग्रामपंचायती, सिडको व पोलीस प्रशासन टाळाटाळ करीत असल्यामुळे चौकांचे नियमबाह्य व विनापरवाना नामकरण वाढले आहे. ४याविषयी एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्याचे निरीक्षक इंदलसिंग बहुरे व वाळूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अशोक कदम यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, चौकाचे विनापरवाना नामकरण करून झालेले अतिक्रमण स्थानिक ग्रामपंचायत, सिडको व एमआयडीसी प्रशासन हटविण्याची गरज आहे. विनापरवाना चौकाचे नामकरण होत असल्याची तक्रार आल्यास आम्ही पोलीस बंदोबस्त देऊन स्थानिक प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण हटवू शकतो. परंतु तक्रारच येत नसल्यामुळे आम्ही कोणावर कारवाई करावी, असा प्रश्नही त्यांनी विचारला.