शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

चारित्र्य संशयावरून खून

By admin | Updated: November 17, 2015 00:32 IST

कडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला दांड्याने मारहाण करीत चाकूने शरीरावर सपासप वार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोराजवळील गायकवाड

कडा : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत पतीने तिला दांड्याने मारहाण करीत चाकूने शरीरावर सपासप वार केल्याची घटना आष्टी तालुक्यातील अंभोराजवळील गायकवाड वस्तीवर रविवारी मध्यरात्री घडली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या त्या विवाहितेचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.राणी विश्वास गायकवाड असे त्या मयत महिलेचे नाव आहे. आष्टी तालुक्यातील अंभोरा येथील गायकवाड वस्तीवर राहत असलेले विश्वास मुरलीधर गायकवाड यांचा विवाह दोन वर्षापूर्वी कर्जत तालुक्यातील दुरगाव येथील राणी हिच्याशी झाला होता. त्यांना तीन महिन्यांचे बाळ आहे. ती काही कारणास्तव सासरी राहत नव्हती. दिवाळीच्या सणासाठी राणीला सासरी आणले पण तिच्या हातावर मेहंदी काढली होती. ही मेहंदी कोणी काढली ? असा प्रश्न पतीने विचारताच, तिने दाजीनी काढली असे सांगितल्याने कुरबूर सुरू झाली. ही कुरबूर टोकाला जाऊन तिच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीने रविवारच्या मध्यरात्री तिला लाकडी दांड्याने मारहाण करून घायाळ केले व धारदार शस्त्राने वार करून खून केला. आरोपीला अंभोरा पोलीस ठाण्यात अटक करण्यात आली आहे. आरोपी विश्वास मुरलीधर गायकवाड हा शेतीचा व्यवसाय करतो. दरम्यान, मयत राणी हिचा मृतदेह शवविच्छेदनासाठी अहमदनगर येथे पाठविले आहे. (वार्ताहर)आष्टी तालुक्यातील अंभोरा ठाणे हे अहमदनगरच्या हद्दीजवळ आहे. अंभोराजवळ असणाऱ्या गायकवाड वस्तीवर हा थरार रविवारी मध्यरात्री घडला.४मात्र, याची माहिती अधीक्षक कार्यालयाला सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत मिळाली नव्हती. एवढी मोठी घटना घडूनही याची माहिती अंभोरा पोलिसांनी वरिष्ठांना का कळविली नाही ? यावर संभ्रम निर्माण झाला आहे.४अंभोरा पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर याची माहिती मुख्य कार्यालयास कळविण्यात येणार होती. मात्र, कोणतीही गंभीर घटना घडल्यास त्याची तात्काळ माहिती अधीक्षक कार्यालयास कळविणे आवश्यक आहे.४अंभोरा पोलिसांनी सकाळी आरोपीला ताब्यात घेतले होते. मात्र, याची माहितीही अधीक्षक कार्यालयाला नव्हती. याचे कारण गुलदस्त्यात आहे.