शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

महाभिषेक सोहळ्याने भाद्रपद पौर्णिमा साजरी

By admin | Updated: September 10, 2014 00:51 IST

कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, कचनेर येथे मंगळवारी भाद्रपद पौर्णिमा उत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला.

कचनेर : श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगंबर जैन अतिशय क्षेत्र, कचनेर येथे मंगळवारी भाद्रपद पौर्णिमा उत्सव मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त भगवंतांचा पंचामृत महाभिषेक करण्यात आला. हा सोहळा डोळ्यात साठवून घेण्यासाठी देशभरातून आलेल्या असंख्य भाविकांनी गर्दी केलीे होती. गेल्या दहा दिवसांपासून मंदिरात पर्युषण पर्वानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. त्या पर्वाचीही क्षमावलीने आज सांगता झाली. तसेच पौर्णिमेनिमित्त महाभिषेक सोहळा पार पडला. इंद्र-इंद्रायणीच्या बोलीचा मान शशिकांत अभयकुमार पंचवाटकर (अंबड), सर्व औषधी-अनमोल चंद्रकुमार कासलीवाल (आडूळ), चंदनलेपन व पुष्पवृष्टी-कपिल, अनुराग जैन परिवार (इंदोर), तीर्थरक्षा कलश-भरतकुमार मदनलाल ठोळे (कसाबखेडा), शांतीमंत्राची बोली अशोककुमार, किशोरकुमार, दीपचंद लोहाडे (जामनेर) यांना मिळाला. अतिशय क्षेत्रातर्फे भंडारदाते हिराबाई वसंतराव सोनटक्के (बिडकीन) व बोली घेणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. बोलीसम्राट अशोक अजमेरा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी क्षेत्राचे महामंत्री भरत ठोळे, अशोक गंगवाल, चिंतामण काळे (अंबड), मनोज साहूजी, प्राचार्य किरण मास्ट, पुजारी रामदास जैन, मंदिराचे व्यवस्थापक स्वप्नील जैन, नितीन जैन आदींसह क्षेत्राचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले. बिडकीननिवासी हिराबाई वसंतराव सोनटक्के यांच्यातर्फे महाप्रसाद देण्यात आला. (वार्ताहर)