दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्याचे रोखले वेतन

By Admin | Updated: January 2, 2015 00:46 IST2015-01-02T00:29:09+5:302015-01-02T00:46:57+5:30

बीड/पाटोदा: आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडणाऱ्या डोंगरकिन्ही (ता़ पाटोदा) येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेतन रोखत गुरुवारी जोरदार दणका दिला़

Cash Withdrawal by Medical Officer | दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्याचे रोखले वेतन

दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्याचे रोखले वेतन


बीड/पाटोदा: आरोग्य केंद्र वाऱ्यावर सोडणाऱ्या डोंगरकिन्ही (ता़ पाटोदा) येथील वैद्यकीय अधिकाऱ्याला जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी वेतन रोखत गुरुवारी जोरदार दणका दिला़ त्यामुळे दांडीबहाद्दर वैद्यकीय अधिकाऱ्यांची पाचावर धारण बसली आहे़
डॉ़ एम़ आऱ खरपाडे असे त्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे नाव आहे़ त्यांच्या जोडीला डॉ़ सतीश सोळंूके हे देखील कार्यरत होते़ मात्र, डॉ़ सोळंूके यांना नायगाव (ता़ पाटोदा) येथील आरोग्य केंद्रात २७ नोव्हेंबर २०१४ रोजी नेमण्यात आले़ महिन्यापूर्वी खरपाडे यांनी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ एच़ व्ही़ वडगावे यांच्याकडे रजेसाठी अर्ज केला़ मात्र, डोंगरकिन्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात ते एकटेच असल्यामुळे त्यांच्या रजेचा अर्ज वडगावे यांनी फेटाळून लावला़ त्यानंतर डॉ़ खरपाडे जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना न कळविताच अनाधिकृतपणे गैरहजर राहिले़ डिसेंबर महिन्यात केवळ दोनच दिवस ते आरोग्य केंद्रात आले़ त्यामुळे त्यांचे वेतन रोखण्यात आले आहे़ सेवा पुस्तिकेतही याची नोंद घेतली आहे़ त्यांची डोंगरकिन्हीतून उचलबांगडीच्या हालचाली आहेत़ (प्रतिनिधी)

Web Title: Cash Withdrawal by Medical Officer