शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
2
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
3
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
4
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
5
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
6
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
7
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
8
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
9
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
10
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
11
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
12
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
13
Mumbra Shocking: ‘ॲक्शन रील’चा भयंकर शेवट, आठ वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू, नेमकं काय घडलं?
14
"कोणाच्या खिशात आहेत माझे पैसे?"; बोनस मिळाल्याच्या चर्चांवर राकेश बेदींचा मजेशीर व्हिडीओ
15
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
16
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
17
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
18
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
19
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
20
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
Daily Top 2Weekly Top 5

क्षमता चार प्रवाशांची, बसवितात दहा ते बारा

By admin | Updated: August 1, 2014 00:28 IST

परंडा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहूक जोरात सुरु असून उत्पन्न वाढविण्यासाठी चालकांकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे.

परंडा : शहर व परिसरात अवैध प्रवासी वाहूक जोरात सुरु असून उत्पन्न वाढविण्यासाठी चालकांकडून प्रवाशांच्या जिवाशी खेळ सुरु आहे. अवैध वाहतुकीमुळे एसटीला फटका बसत आहे. अ‍ॅपे रिक्षाची चार प्रवाशांची क्षमता असताना दहा ते बारा प्रवाशी कोंबले जातात. काळीपिवळी जीप आणि खाजगी वाहनांद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. या व्यतिरीक्त टमटमद्वारेही मोठया प्रमाणात अवैधरित्या वाहतूक होत आहे. या वाहनांची संख्या इतर वाहनाच्या बरोबरीने आहे. अ‍ॅपे रिक्षा शहरापासून १३ कि. मी वरील वारदवाडी पर्यत प्रवाशी वाहतूक करतात. त्यात सोनगिरी, खासगाव, ढगपिंपरी फाटा, बाम्हणगाव, चांदणी या गावांचा समावेश प्रामुख्याने होते. प्रत्येक वाहनांना प्रवासी वाहतूक क्षमता ठरवून देण्यात आली आहे. मात्र, संबंधितांकडून हा नियम कधीही पाळला जात नाही. अ‍ॅपे रिक्षाची प्रवासी क्षमता चार इतकी असते. परंतु, या वाहनातून सर्रास १२ ते १३ प्रवासी घेऊन जातात. जीपच्या बाबतीतही काही वेगळे चित्र नाही. सात प्रवासी बसविण्याची परवानगी असताना प्रत्येक्ष चौदा ते सोळा प्रवासी बसवून वाहने सुसाट दामटली जातात. हे चित्र विशेषत: बार्शी, सोनारी, आनाळा, खासापुरी, राजुरी, जवळा या आवांना जोडणाऱ्या मार्गावर पहावयास मिळते. गाडीमध्ये जागा नसल्यास अशा वेळी समोरील बाजूस चालकासह चार, चालकाच्या पाठीमागील आसनावर सहा, सर्वात शेवटी आठ, टपावर सहा असे २४ प्रवासीही बसविले जातात. अशावेळी प्रवाशांच्या जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता असते. अवैध प्रवासी वाहतूक खुलेआम सुरू असतानाही संबंधित यंत्रणा मात्र, याकडे दुर्लक्ष करीत आहे. पोलिसांचे या वाहनधारकांशी लागेबांधे असल्याचेही बोलले जाते. (वार्ताहर) एसटीला फटका परंडा आगाराच्या बसद्वारे परंडा-बार्शी या मार्गावर सध्या सोळा फेऱ्या केल्या जातात. परंतु, याही बसफेऱ्यांना अवैैध वाहतुकीचा फटका बसत आहे. सर्वाधिक फटका हा सोनारी, आनाळा अंभी, प्राथ्रुड, साकत, पांचपिपंळा, कुभेफळ,जवळा मार्गावरील खासापुरी, राजुरी, करमाळा राज्यमार्गावरील डोमगांव, आवाटी मार्गे करमाळ्याकडे जाणाऱ्या बसेसला बसत आहे. उत्पन्नावर जवळपास ६० टक्के फरक पडत असल्याचे सांगण्यात आले. कुर्डवार्डीकडे जाणाऱ्या मार्गावर सर्वाधिक अवैध प्रवासी वाहतूक होत असल्याने परंडा आगाराची एकही बस सुरू नाही. या सर्व बाबींमुळे हे आगार तोट्यात सुरू असल्याने भूम आगाराला जोडण्याच्या हालचाली सुरू असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.