विमान रद्द; प्रवासी संतप्त

By Admin | Updated: December 17, 2014 00:39 IST2014-12-17T00:37:30+5:302014-12-17T00:39:24+5:30

औरंगाबाद : स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान मंगळवारी अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला

Cancellation of aircraft; Expatriate angry | विमान रद्द; प्रवासी संतप्त

विमान रद्द; प्रवासी संतप्त

औरंगाबाद : स्पाईस जेटचे दिल्लीला जाणारे विमान मंगळवारी अचानक रद्द झाल्याने १२२ प्रवाशांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. पैसे भरूनही विमानतळाबाहेर बसावे लागल्याने आणि सुमारे चार तास ताटकळल्याने संतप्त प्रवासी आंदोलकाच्या भूमिकेत आले. त्यांनी ‘स्पाईस जेट हाय हाय’च्या घोषणा दिल्या.
स्पाईस जेट कंपनीचे (सीजी १७३) या नंबरचे विमान दुपारी १२.३० वाजता दिल्लीला जाणार होते. मात्र, कंपनीने हे विमान अचानक रद्द केले. त्याचा मेसेज सर्व प्रवाशांच्या मोबाईलवर पाठविण्यात आला. त्यात विमानाची वेळ दुपारी ३.३० वाजेची देण्यात आली. मात्र, पुन्हा काही वेळाने मेसेज आला की, ३.३० ऐवजी सायंकाळी ५.३० वाजता विमान निघेल.

Web Title: Cancellation of aircraft; Expatriate angry