शहरं
Join us  
Trending Stories
1
विकासाची ब्ल्यू प्रिंट तयार, तरुणांनी पाठवाव्या आयडिया, २०४७ पूर्वीच...; PM मोदींचा निर्धार
2
कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
3
पक्ष सांभाळू शकत नाहीत, ते देश काय सांभाळणार? PM नरेंद्र मोदी, ‘रोड शो’मधून शक्तिप्रदर्शन
4
कल्याण शहर झाले ‘नरेंद्र मोदी’मय; जयघोष, जल्लोष, सेल्फी पॉइंट अन् बरेच काही...
5
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवले: आदित्य ठाकरे, लोकमतला खास मुलाखत
6
एकहाती सत्तेपेक्षा ‘मिलीजुली’ सरकार देशहिताचे; आमदार आदित्य ठाकरे यांचे ठाम मत
7
मोदींच्या रोड शोमुळे मेट्रोसेवा बाधित; जागृतीनगर ते घाटकोपर मेट्रोसेवा दोन तास बंद
8
पंतप्रधान मोदींच्या मुंबई दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर; चर्चांना उधाण
9
मुंबईला आर्थिकदृष्ट्या कमजोर करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे; आदित्य ठाकरे यांची टीका
10
२६/११च्या खटल्यात कोणी दबाव आणला होता का? उज्ज्वल निकम यांनी सांगावे: प्रकाश आंबेडकर
11
वाहतूककोंडीवर काढणार कायमस्वरुपी तोडगा; प्रचार फेरीत पीयूष गोयल यांची ग्वाही
12
घाटकोपर होर्डिंग प्रकरण: ‘व्हीजेटीआय’ची नियुक्ती, भिंडेच्या शोधासाठी ७ तपास पथके
13
वाधवानने ६६ कंपन्यांतून वळवले २४ हजार कोटी; ‘सीबीआय’च्या तपासात माहिती उघड 
14
सलमान खान गोळीबार प्रकरण: आरोपीच्या मृत्यूप्रकरणी तपास अहवाल द्या; हायकोर्टाचे निर्देश
15
व्यावसायिकाच्या घरावर पोलिसांच्या मदतीने दरोडा; निवडणुकीसाठीचा पैसा दडवल्याचा बनाव
16
खार, वांद्रे परिसरांत ६६ लाखांची रोकड जप्त; आचारसंहिता भरारी पथकाची कारवाई
17
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
18
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
19
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
20
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!

औरंगाबाद जिल्ह्यात महावितरणची कृषिपंपांविरुद्ध धडक मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 5:46 PM

महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

औरंगाबाद : जिल्ह्यात यंदा पावसाने पाठ फिरवल्यामुळे शेतकरी संकटात सापडले आहेत. हातातोंडाला आलेली पिके  माना टाकू लागली आहेत. त्यामुळे मिळेल तेवढे पाणी पिकांना देण्याची सध्या चढाओढ सुरू आहे. परिणामी, रोहित्र जळण्याची संख्या वाढली असून, दुरुस्तीची मागणीही वाढली आहे. त्यामुळे महावितरणने आकडे टाकून विजेचा वापर करणाऱ्या कृषिपंपांची वीज तोडणे, जळालेल्या रोहित्रांच्या दुरुस्तीसाठी थकबाकीदार कृषिपंपचालक शेतकऱ्यांकडून किमान वीज बिल वसूल करण्याची मोहीम महावितरणने सुरू केली आहे. 

यासंदर्भात महावितरणचे मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांनी सांगितले की, १९ सप्टेंबर रोजी महावितरणच्या संचालकांनी (संचलन) राज्यातील सर्व परिमंडळांना कृषिपंपांचे अनधिकृत वीज कनेक्शन तोडण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार औरंगाबाद जिल्ह्यात मागील तीन-चार दिवसांपासून या मोहिमेने वेग घेतला आहे. सध्या शेतीला पाणी देण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे. त्यामुळे नेहमीपेक्षा तब्बल २० ते २५ टक्के जास्तीची विजेची मागणी वाढली असून रोहित्र जळण्याची संख्याही वाढली आहे. एकेका शेतामध्ये दोन-दोन विद्युत मोटारी सुरू असल्याचेही गणेशकर यांचे म्हणणे आहे. त्यामुळे रोहित्र जळण्याचे प्रमाण वाढले आहे.

रोहित्र दुरुस्तीसाठी परिसरातील थकबाकीदार शेतकऱ्यांनी ज्यांचे २५ हजार रुपयांपर्यंत वीज बिल थकले असेल, त्यांनी किमान ३ हजार रुपयांची थकबाकी भरावी, तर ज्यांचे २५ हजार रुपयांपेक्षा अधिक बिल थकले आहे, त्या शेतकऱ्यांनी किमान ५ हजार रुपये थकबाकी भरल्यास रोहित्र दुरुस्त करून देण्याची अट महावितरणने घातली आहे. दिवसेंदिवस कृषिपंपांच्या थकबाकीमध्ये मोठी वाढ होत चालली आहे. कृषी ग्राहकांवरील वीज बिलाच्या थकीत रकमेचा बोजा कमी करण्यासाठी हे अभियान हाती घेतले आहे. 

कृषिपंपांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये थकबाकीजिल्ह्यात एकूण २ लाख १६ हजार ५९३ कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ७०२ कोटी १६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, यापैकी २५ हजारांपेक्षा जास्त थकबाकी असलेले १ लाख ८५ हजार ४४५ ग्राहक आहेत. त्यांच्याकडे १ हजार ६६० कोटी ५९ लाख रुपये थकबाकी आहे, तर २५ हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकी असलेले ३१ हजार १४८ ग्राहक असून त्यांच्याकडे ४१ कोटी ५७ लाख रुपये थकबाकी आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीAgriculture Sectorशेती क्षेत्रmahavitaranमहावितरणAurangabadऔरंगाबाद