शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातच रोखल्या संतप्त विद्यार्थिनींनी बसेस

By admin | Updated: July 8, 2017 00:06 IST

मानवत : मानवत-पाळोदी रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणावरून महामंडळाने या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत

लोकमत न्यूज नेटवर्कमानवत : मानवत-पाळोदी रस्त्याचे काम सुरू असल्याच्या कारणावरून महामंडळाने या मार्गावर धावणाऱ्या बसेस बंद केल्याने शालेय विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. बस सुरू करण्याच्या मागणीसाठी जवळपास १५० विद्यार्थिनींनी ७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास मानवत बसस्थानकातील बसेस रोखून धरत संताप व्यक्त केला. या प्रकारामुळे तब्बल अर्धा तास बसेस बसस्थानकातच अडकून पडल्या. मानवत तालुक्यातील मानवत-पाळोदी या २० कि.मी. रस्त्यावर अर्थसंकल्पातून १४ कि.मी.चे काम मंजूर करण्यात आले आहे. या रस्त्यावरील मंजूर कामांपैकी ८ कि. मी. चे एमपीएमचे काम पूर्ण झाले आहे. तर ६ कि. मी. रस्त्यावरील खड्डे भरण्यात आले आहेत. या रस्त्याचे काम मे महिन्यात सुरू असताना संबंधित ठेकेदारांनी या रस्त्यावरील महामंडळाची वाहतूक बंद करण्याबाबतचे पत्र विभागीय वाहतूक अधिकारी परभणी यांना दिले होते. त्यानंतर या रस्त्यावरील बससेवा बंद करण्यात आली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने रस्त्याचे काम बंद आहे. १५ जून रोजी शाळा सुरू झाल्याने या रस्त्यावरील हत्तलवाडी, आंबेगाव, सावळी, सावरगाव, बोंदरवाडी, खडकवाडी, पिंपळा, पाळोदी या भागातून शालेय विद्यार्थ्यांना मानवत शहरात येण्यासाठी गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. बससेवा बंद असल्याने खाजगी वाहनाने विद्यार्थ्यांना शाळा गाठावी लागत आहे. पालकांनी एसटी आगाराकडे वारंवार पाठपुरावा करीत बससेवा सुरू करण्याची मागणी केली. मात्र खराब रस्त्याचे कारण देऊन बस सुरू करण्यात आली नाही. ७ जुलै रोजी दुपारी एकच्या सुमारास १५० विद्यार्थिनी व पालकांनी बसस्थानकातच बस रोखून धरीत आंदोलन सुरू केले. बस सुरू करेपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय विद्यार्थ्यांनी घेतल्यानंतर चांगलीच कोंडी निर्माण झाली. शेवटी बसस्थानकाचे नियंत्रक गवळी यांनी पाथरी आगारप्रमुखांशी संपर्क साधल्यानंतर ९ जुलैपासून बस सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात युवा सेनेच संतोष जाधव, संदीप जाधव, सतीश काळे, आसाराम शिंदे, गोविंद जाधव यांच्यासह शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते.