शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच भडकावू विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
3
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
4
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
5
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
6
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
7
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
8
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
9
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
10
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
11
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
12
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
13
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
14
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
15
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
16
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
17
Video: डोंगराळ मार्गावरून जात असताना अचानक रस्ता खचला, बघता-बघता ट्रक आत रूतला अन् मग...
18
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
19
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
20
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
Daily Top 2Weekly Top 5

बसस्थानकातील फुकट्या पोस्टरबाजांना बसणार चाप!

By admin | Updated: May 13, 2014 01:17 IST

नांदेड: शहरातील जवळपास सर्वच चौक बॅनर आणि पोस्टरने विदू्रप झाले आहेत़

नांदेड: शहरातील जवळपास सर्वच चौक बॅनर आणि पोस्टरने विदू्रप झाले आहेत़ त्यात बसस्थानकातही ठिकठिकाणी विनापरवानगी पोस्टर आणि बॅनर लावण्यात येतात़ त्यामुळे बसस्थानकाचे मोठ्या प्रमाणात विद्रूपीकरण झाले आहे़ अशा फुकट्या पोस्टरबाजांना चाप बसविण्यासाठी आता एसटी प्रशासनाने पावले उचलली आहेत़ जयंती, पुण्यतिथी, नेत्यांचे वाढदिवस किंवा उत्पादनाच्या प्रसिद्धीसाठी सध्या दिसली मोकळी जागा की लाव बॅनर, पोस्टर असा प्रकार नांदेडात सर्रासपणे पहावयास मिळतो़ शहरात बॅनर लावण्यासाठी मनपाकडून परवानगी घेणे आवश्यक असते़ परंतु फुकट्या प्रसिद्धीची चटक लागलेल्यांना त्याच्याशी काहीएक देणे-घेणे नसल्याचेच दिसत आहे़ त्यामुळे शहरातील सर्वच रस्ते, चौक विद्रूप झाले आहेत़ त्याला बसस्थानकही कसे अपवाद राहील! बसस्थानक प्रवेशद्वारापासूनच पोस्टर आणि भिंती रंगविलेल्या पहावयास मिळतात़ आगारप्रमुखाच्या कक्षाबाहेर, चौकशी कक्ष, पोलिस चौकी, बसण्याच्या जागा, बसेसमध्ये आतून अन् बाहेरुन विशेष म्हणजे लघूशंकागृहही या जाहिरातबाजांनी सोडले नाही़ खड्डयामुळे अगोदरच बकाल दिसत असलेले बसस्थानक पोस्टरबाजीमुळे आणखीच ओंगळवाणे झाले़ या प्रकाराला चाप लावण्यासाठी आता विभाग नियंत्रक बी़डब्ल्यू. घुले व आगारप्रमुख संजय वाळवे, बी़ एच़ मोरे, सचिन चव्हाण यांनी पावले उचलली आहेत़ सार्वजनिक मालमत्तेचे विदू्रपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्याची तयारी केली आहे़ कारवाईमुळे फुकट्या पोस्टरबाजांना काही प्रमाणात का होईना, परंतु चाप बसण्याची आशा निर्माण झाली आहे़ त्याचबरोबर आॅटो आणि खाजगी वाहतुकीला आळा घालण्यासाठी पोलिसांशी चर्चा करण्यात येणार आहे़ (प्रतिनिधी)