शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

१५० घरांवर बुलडोजर

By admin | Updated: June 4, 2014 00:45 IST

नांदेड: विभागीय रेल्वे कार्यालयाच्या मंडळ इंजिनिअर्स विभागाकडून दोन वेळा नोटीस पाठवून व निर्धारित वेळेत रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण न काढणार्‍या

नांदेड: विभागीय रेल्वे कार्यालयाच्या मंडळ इंजिनिअर्स विभागाकडून दोन वेळा नोटीस पाठवून व निर्धारित वेळेत रेल्वेच्या मालकीच्या जमिनीवरील अतिक्रमण न काढणार्‍या शहरातील प्रभाग क्रमांक १८ मधील लालवाडी परिसरातील १५० झोपडपट्या आणि घरे पोलिस बंदोबस्तात काढले. रेल्वे अधिकार्‍यांनी मनपा व महावितरण विभागाने रेल्वेच्या जमिनीवर काम करण्याची अगोदर कोणतीच परवानगी घेतली नसल्याची तक्रार केली आहे़ बीएसयूपी योजनेमध्ये हस्तांतरित केलेल्या जवळपास १०० घरकुलांना अवैध असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळवून त्यावर मार्कींग केले होते़ ही जागा रेल्वे प्रशासनाची असताना याठिकाणी मनपाने सुविधा कशा पुरविल्या असा प्रश्न पडला आहे़ सोमवारी अतिक्रमण हटविण्याची कारवाई केल्यानंतर सहाय्यक विभागीय अभियंता (जनरल) एल़ बिक्षापती आणि बी. दयाल यांनी सांगितले की, मार्च व एप्रिल महिन्यात दोन वेळा रेल्वेची जमीन खाली करण्यासंदर्भात संबंधितांना नोटीस देण्यात आली होती़ २० मे रोजी जिल्हाधिकारी धीरजकुमार, मनपा आयुक्त जी़श्रीकांत आणि पालकमंत्री डी़ पी़ सावंत यांनी संबंधित परिसराबद्दल चौकशी केली होती़ यानंतर त्यांना रेल्वे प्रशासनाने नोटिसांच्यासंदर्भात माहिती दिली़ अधिकार्‍यांनी चर्चा केल्यानंतर येथील रहिवाशांनी दहा दिवसांचा वेळ मागितला होता़ त्यानंतर आम्ही आज अतिक्रमण हटविण्याची कारवाई सुरू केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले़ सहाय्यक विभागीय अभियंता बी़ दयाल म्हणाले, रेल्वेपटरीपासून १०० मीटरपर्यंतची जमीन रेल्वे प्रशासनाच्या नियंत्रणात असते़ १०० मीटरपर्यंतच्या परिसरात लालवाडीमध्ये आम्ही मार्किंगदेखील केली होती़ ज्यामध्ये मनपातर्फे बसविण्यात आलेले स्ट्रीट लाईट व महावितरणचे खांब होते़ यासंदर्भात स्थानीय प्रशासनाने रेल्वे विभागाचे कोणतेच नाहरकत प्रमाणपत्र घेतले नव्हते़ रेल्वे सुरक्षा बलाचे पोलिस निरीक्षक डी़ डी़ बैनवाड म्हणाले, अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत अडसर निर्माण करणार्‍या लोकांना हटविण्यासाठी ५० पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते़ यामध्ये दोन पोलिस निरीक्षक, दोन पोलिस उपनिरीक्षक, दोन महिला पोलिस व इतर ५० पोलिस कर्मचार्‍यांचा समावेश होता़ शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडून अतिरिक्त पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला होता़ नागरिकांची काय चूक? मनपा अधिकार्‍यांनी संबंधित जमीन रेल्वे प्रशासनाची असूनदेखील नागरिकांना अंधारात ठेवण्याचे काम केले़ विशेष म्हणजे, या परिसरात १९६७ मध्ये महाराष्टÑ प्रज्ञा करुणा विद्याविकास संस्थेने इंदिरा विद्यालयाची स्थापना केली़ या अनुदानित शाळेला राज्य सरकारची मंजुरी आहे़ (प्रतिनिधी)