कळंब : ‘भाऊ’ काय हवा आहे तुमच्याकडे? कोणाचा पत्ता यंदाच्या निवडणुकीत कट होईल? या आणि अशा गप्पांनी सध्या मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. मतदारांनी आपापल्या परीने उमेदवारांचीक्रमवारीही ठरविण्यास सुरवात केली आहे.कळंब-उस्मानाबाद मतदारसंघात सध्या चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र आहे. सर्वच प्रमुख पक्षांनी नेटाने प्रचारयंत्रणा राबविण्यास सुरुवात केल्याने मोठी चुरस निर्माण झाली आहे. यामुळे कोणाच्या मागे मतदार जातील? हा प्रश्न अजुनतरी अनुत्तरीत दिसत आहे. ही सर्व निवडणूक प्रचारातील परिस्थिती पाहून मतदारांमध्येही संभ्रमावस्था दिसून येत आहे. तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? एक नंबर व दोन नंबरला कोण राहील? कोणाची हवा जोरात आहे? अशा प्रश्नांनीच आता सामान्यत: चर्चेला सुरुवात होताना दिसत आहे. या निवडणुकीत चार तगडे उमेदवार असल्याने अंदाज काढणे कठीण असल्याचे निष्कर्षही काढले जात आहेत. राष्ट्रवादी, सेना, भाजप व काँग्रेस या पक्षांनी सुत्रबद्धपणे प्रचार यंत्रणा राबविण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या टीमद्वारे प्रचारफेरी, प्रत्यक्ष भेटी, कॉर्नर सभा तसेच वाहनांद्वारे प्रचार करण्यावर या पक्षांचा भर दिसून येतो आहे. प्रत्येक गावातील पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांना प्रचारकार्यात सक्रीय करण्याचा प्रयत्न या पदाधिकाऱ्यांकडून होतो आहे. याचा कितपत फायदा वातावरण निर्मितीसाठी होईल, याचेही आडाखे बांधले जात आहेत. सध्या पक्षीय हवेऐवजी उमेदवारांची हवा कशी आहे? या विषयावरच चर्चा रंगू लागली आहे. त्यामुळे पक्षाच्या बॅनरवर मते मागण्याऐवजी मी कसा योग्य आहे? हे सांगण्यावर उमेदवारांचा भर दिसतो आहे. वैयक्तिक टिकाही सभांमधून केल्या जात आहेत. पक्षाने काय केले हे सांगण्यापेक्षा तुम्ही काय केले हे सांगा, अशी भावना मतदारांतून व्यक्त केली जात आहे. या निवडणुकीत पक्षाच्या सिम्बॉलऐवजी मतदारांच्या कामांचे वैयक्तिक मुल्यमापन केले जात आहे. पक्षाचे मतदान फिक्स असले तरी ते निवडून येण्यास पुरेसे ठरणार नाही. आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा उमेदवारांना मांडावा लागणार असल्याने आगामी काळात प्रचारसभांमध्ये कलगीतुरा वैयक्तिक टिका टिप्पणीवर रंगणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. मतदारसंघात सगळेच उमेदवार प्रचाराच्या माध्यमातून आपली बाजू मांडत असून, येत्या काही दिवसांत कोण किती पुढे आहे? हे दिसून येणार आहे.निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुरु झालेले विविध पक्षांमधील इनकमिंग, आऊटगोर्इंग मतदान जवळ आले तसे वाढताना दिसत आहे. या कार्यकर्त्यांचा पक्षाला कितपत फायदा होईल हे सांगणे अवघड असले तरी त्यामुळे सकारात्मक वातावरण निर्मिती होते, असे पक्षीय नेत्यांचे म्हणणे आहे. पक्षामध्ये कार्यकर्ते येण्यास उत्सुक आहेत. म्हणजे या पक्षाला व उमेदवाराला भविष्य आहे, असा संदेश मतदारांमध्ये जायला मदत होते आणि मतांमध्येही वाढ होते, असा दुहेरी फायदा होत असल्याचे गणितही काही कार्यकर्त्यांमधून मांडले जात आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याबाबत सध्या राष्ट्रवादी व सेनेमध्ये मतदारसंघात चढाओढ लागलेली दिसत आहे. एका पक्षाच्या नेत्याने तर नवरात्र महोत्सवासाठी देणगी देतो म्हणून काही कार्यकर्ते बोलविले व त्यांच्या गळ्यात गमजे घालून फोटोसेशनही केले. दुसऱ्या दिवशी या कार्यकर्त्यांना आपण रात्री ‘त्या’ पक्षामध्ये प्रवेश केल्याचे सांगण्यात आल्याचा गमतीशीर किस्साही सध्या कळंब शहरांमध्ये चर्चिला जात आहे.
भाऊ,काय हवा आहे ?
By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST
कळंब : ‘भाऊ’ काय हवा आहे तुमच्याकडे? कोणाचा पत्ता यंदाच्या निवडणुकीत कट होईल? या आणि अशा गप्पांनी सध्या मतदार संघात राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
भाऊ,काय हवा आहे ?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}