खून प्रकरणी दोघांना अटक

By Admin | Updated: June 9, 2015 00:19 IST2015-06-09T00:19:15+5:302015-06-09T00:19:15+5:30

माजलगाव : बांधकामाच्या हिशेबाच्या कारणावरून मिस्त्रीचा खून केल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी सोमवारी शहर पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. एक आरोपी फरार आहे.

Both arrested in the murder case | खून प्रकरणी दोघांना अटक

खून प्रकरणी दोघांना अटक

माजलगाव : बांधकामाच्या हिशेबाच्या कारणावरून मिस्त्रीचा खून केल्याची घटना रविवारी घडली होती. याप्रकरणी सोमवारी शहर पोलिसांनी दोघांना जेरबंद केले. एक आरोपी फरार आहे.
वशिष्ट दशरथ गोपाळ (४५, रा. मनूर, ता. माजलगाव) असे मयताचे नाव आहे. राशेद शेख सलीम, शेख रियाज शेख जकीर, शेख जुनेद (सर्व रा. बिलाल मोहल्ला, माजलगाव) यांचा आरोपींत समावेश आहे.
गोपाळ यांना घरी बोलावून बांधकामाचा हिशेब का करीत नाहीस ? असे म्हणून मारहाण करण्यात आली. यात त्यांचा मृत्यू झाला होता. अशोक गोपाळ यांच्या फिर्यादीवरून शहर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. राशीद सलीम, शेख रियाज यांना अटक करण्यात आली आहे. (वार्ताहर)

Web Title: Both arrested in the murder case