शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

उदंड जाहल्या संघटना..!

By admin | Updated: January 18, 2015 00:30 IST

दत्ता थोरे , लातूर सामाजिक सेवेच्या नावाखाली सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे संस्था, संघटनांची नोंदणी करुन गोरखधंदा मांडणाऱ्या संघटनांची लातुरात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुनच पुढे येत आहे

दत्ता थोरे , लातूरसामाजिक सेवेच्या नावाखाली सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडे संस्था, संघटनांची नोंदणी करुन गोरखधंदा मांडणाऱ्या संघटनांची लातुरात वाढ झाल्याचे आकडेवारीवरुनच पुढे येत आहे. आतापावेतो जिल्ह्यात २२ हजार ६५४ संस्था-संघटनांनी नोंदणी केली असून हा ‘गनिमी कावा’ नोंदणीच्या फार्सपुरताच दिसतो आहे. कारण यातील २० टक्के संस्था, संघटनांच पुढे आॅडीटला पुन्हा सहाय्यक धर्मादाय आयुक्ताचे कार्यालय गाठतात. बाकीचे जातात कुठे ? असा प्रश्न आहे. जिल्ह्यात अनेक चांगले काम करणाऱ्या संस्था आणि संघटना आहेत. मात्र तरीही गनिमी कावा या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रतापानंतर ‘लोकमत’ने जिल्ह्यात संस्था, संघटनांची नोंदणी तरी किती आहे, याचा शोध घेतला. यात जिल्ह्यात डिसेंबर अखेर तब्बल २२ हजार ६५४ संस्थांची नोंदणी झाल्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त शशिकांत हेर्लेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. नोंदणी झालेल्या संस्थांपैकी याच कार्यालयाकडे आॅडीट दाखल करायला येणाऱ्या संस्था, संघटनांचे प्रमाण किती तर अवघे २० टक्केच आहे. मग बाकीच्या संस्था पुढे जातात कुठे आणि करतात काय ? असा यक्षप्रश्न आहे. धर्मादाय आयुक्ताकडे आपल्या संस्था अगर संघटनेची नोंदणी करुन देण्याचे गुत्ते घेणाऱ्या काही व्यक्ती परिसरात घुटमळत असतात. एका ठराविक आकड्यात पैसा घेतला की हे लोक संघटनेच्या नावाची फाईल तयार करुन, नोंदणी करुन त्यांची दोन प्रमाणपत्रे मिळवून देईपर्यंतचा पाठपुरावा करुन थेट हातात आणून देतात. त्यामुळे अनेक संघटनावाल्यांना आपल्या संस्थेच्या घटनेत काय आहे ? याचीही माहिती नसते. जात कोणतीही असो... महापुरुष कोणताही असो... परंतु या संघटनांचा त्रास मात्र व्यापारी, उद्योजक, डॉक्टर्स आणि राजकीय लोकांनाही होतो आहे. संघटनेने कोणताही कार्यक्रम घ्यायचा किंवा सामाजिक उपक्रम राबवायचा हे ठरविले की याचे पैसे गोळा करण्यासाठी अक्षरश: खंडणीसारखे पैसे उकळले जातात. याचा त्रास जिल्ह्यातील क्लासेसवाले, व्यापारी, उद्योजक, अधिकारी आणि राजकीय नेत्यांनाही वाढला आहे. सामाजिक कार्याची ओळख सांगणाऱ्या या संघटना उदंड झाल्या आहेत.