शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्याच दिवशी पुस्तके अन फुल !

By admin | Updated: June 14, 2014 01:19 IST

बीड : शाळेचा पहिला दिवस आता ‘बूक डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे़ पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजींकडून पुस्तके व फूल देऊन स्वागत होणार आहे़

बीड : शाळेचा पहिला दिवस आता ‘बूक डे’ म्हणून साजरा केला जाणार आहे़ पहिल्या दिवशी शाळेत पाऊल ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरुजींकडून पुस्तके व फूल देऊन स्वागत होणार आहे़ जिल्ह्यात तब्बल ३ लाख ८५ हजार विद्यार्थ्यांना मोफत पुस्तकांचा लाभ मिळणार आहे़पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व शिक्षा अभियानकडून मोफत पुस्तके दिली जातात़ पुस्तकांअभावी एकही मूल शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा तसेच अनुदानित खाजगी शाळांमधील मोफत पुस्तके दिली जातात़ औरंगाबाद येथील विभागीय भांडारमधून तालुकास्तरावर पुस्तके पोहोच केली जातात़ १६ जून रोजी शाळांना सुरुवात होत आहे़ पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थ्यांची संख्या ३ लाख ८५ हजार १०२ इतकी आहे़ या सर्व विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके, स्वाध्याय पुस्तके पुरविण्यात येणार आहेत़ सर्व विषयांची पुस्तके उपलब्ध झाली आहेत़ शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडावीत असे नियोजन केले असल्याचे शिक्षणाधिकारी (प्रा़) भास्कर देवगुडे यांनी सांगितले़ शाळेचा पहिला दिवस पुस्तक दिन म्हणून साजरा केला जाणार आहे़ त्यासाठी संबंधित गावातील पदाधिकारी, अधिकारी व पालक यांना निमंत्रित केले जाईल़ सर्व गटशिक्षण अधिकारी, मुख्याध्यापक यांना याबाबत सूचना केल्या असल्याचेही देवगुडे म्हणाले़अशी आहे विद्यार्थी संख्यापहिली ते पाचवी प्राथमिक शाळेतील विद्यार्थीसंख्या २ लाख ४६ हजार ८६८ इतकी आहे़ अंबाजोगाई- २६६७१, आष्टी- २११६२, बीड (ग्रामीण) - २७३११, धारुर- ११४२२, गेवराई- ३१६०१, केज- २१३९७, माजलगाव- २३९७५, परळी- २८६७३, पाटोदा- १०७११, शिरुर- ९९३५, वडवणी- ८२०० बीड (शहर) २५८१० इतक्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके मिळतील़ तर सहावी ते आठवी उच्चप्राथमिक शाळेतील विद्यार्थी संख्या १ लाख ३८ हजार २३४ इतकी आहे़ अंबाजोगाई- १६५७४, बीड (ग्रामीण)- १५२१८, आष्टी- १२९२३, धारुर- ५२१७, गेवराई- १६०६२, केज- १२५२५, माजलगाव- १२३८४, परळी- १५३६२, पाटोदा- ६३५५, शिरुर- ५७७२, वडवणी- ४४५०, बीड (शहर)- १५४०२ इतकी विद्यार्थी संख्या आहे़ (प्रतिनिधी)