अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

By Admin | Updated: January 30, 2015 00:50 IST2015-01-30T00:32:10+5:302015-01-30T00:50:49+5:30

आष्टी : तालुक्यातील सावरगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन गावातीलच पाच जणांनी खून केल्याचे समोर आले आहे.

The blood of youth through immoral relations | अनैतिक संबंधातून तरुणाचा खून

अनैतिक संबंधातून तरुणाचा खून


आष्टी : तालुक्यातील सावरगाव येथील एका ३२ वर्षीय तरुणाचा अनैतिक संबंधाच्या कारणावरुन गावातीलच पाच जणांनी खून केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी अंभोरा पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गोरख मुरलीधर म्हस्के असे त्या खून करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. मच्छिंद्रनाथ देवस्थानच्या यात्रेत तमाशा पाहाण्यासाठी जात असल्याचे सांगुन गेला होता मात्र तो परतला नव्हता. सर्व ठिकाणी तपास करुन गोरखच्या आईवडीलांनी अंभोरा पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दिली होती. त्यानंतरही कुटूंबियांनी त्याचा शोध सुरु ठेवला होता.
दरम्यान, २८ जानेवारी रोजी सावरगाव-पटेलवाडा तांडा परिसरातील विहिरीत गोरखचा मृतदेह आढळून आला होता. त्याचा खून करुन हे प्रेत विहिरीत टाकले असावे असा संशय गोरखचा चुलता रोहिदास गंगाराम म्हस्के यांनी व्यक्त केला. सदरील प्रकरणातील आरोपी बलभीम म्हस्के यांच्या पत्नीशी गोरख यांचे अनैतिक संबंध असल्यामुळे त्याचा खून करुन प्रेत विहिरीत फेकले असावे असा संशय पोलिसांना आला. तपास सहायक निरीक्षक शिवाजी गुरमे करीत आहेत.
आरोपींच्या शोधासाठी पथके
गोरख म्हस्के याच्या मारेकऱ्यांना पकडण्यासाठी पथके रवाना केली आहेत, असे सहायक निरीक्षक गुरमे म्हणाले़ यात्रेतून गोरख गायब कसा झाला ? याची माहितीही काढणे सुरू आहे़ लवकरच आरोपी गजाआड करू, असे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़ (वार्ताहर)
या आधारावर तसेच चौकशी अंती गावातीलच बाबासाहेब महादेव म्हस्के, बलभीम महादेव म्हस्के, रमेश महादेव म्हस्के, दौलत महादेव म्हस्के बापु महादेव म्हस्के यांच्या विरुद्ध बुधवारी रात्री खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरु आहे.

Web Title: The blood of youth through immoral relations