शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

रक्त दुपटीने महागले

By admin | Updated: June 20, 2014 01:14 IST

बापू सोळुंके , औरंगाबाद शासकीय रक्तपेढ्यातील होल ब्लड पिशवीचा दर दुपटीहून अधिक तर खाजगी ब्लड बँकांमध्ये ८५० रुपयांऐवजी १४५० रुपये झाला आहे.

बापू सोळुंके , औरंगाबादरक्त आणि रक्तघटकाच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने जाहीर केल्यामुळे शासकीय रक्तपेढ्यातील होल ब्लड पिशवीचा दर दुपटीहून अधिक तर खाजगी ब्लड बँकांमध्ये ८५० रुपयांऐवजी १४५० रुपये झाला आहे. रक्तपुरवठा करण्यापूर्वी रक्ताच्या विविध चाचण्या कराव्या लागतात. ते साठवून ठेवणे, त्यासाठी लागणारे तंत्रज्ञ, यंत्रसामग्री आणि डॉक्टर्स या सगळ्या खर्चाचा विचार करता रक्ताचे दर परवडत नव्हते. रक्त आणि रक्तघटकाचे दर वाढविण्यात यावेत, अशा मागणीची याचिका दी फेडरेशन आॅफ नागपूर ब्लड बँकेने उच्च न्यायालयात केली होती. कोर्टाच्या निर्देशानुसार शासनाने १६ सदस्यीय समिती स्थापन करून शुल्क निश्चितीसंदर्भात अहवाल सादर करण्याचे सांगितले होते. समितीच्या शिफारशीनुसार सुधारित सेवा शुल्काचा प्रस्ताव राज्य रक्तसंक्रमण परिषदेतर्फे राष्ट्रीय रक्तसंक्रमण परिषदेकडे पाठविण्यात आला होता. राष्ट्रीय परिषदेने त्या प्रस्तावाला मंजुरी दिल्यामुळे सार्वजनिक आरोग्य विभागाने राज्यातील रक्त, रक्तघटकाचे दर वाढविण्याचा निर्णय १८ जून रोजी घेतला. शासकीय रक्तपेढ्यातील दर दुपटीहून अधिक तर खाजगी रक्तपेढ्यांमधून आता होल ब्लड पिशवी ८५० रुपयांऐवजी १४५० रुपयांना मिळेल. जागतिक आरोग्य संघटनेनुसार केवळ एक टक्का रक्तदातेच सर्व रुग्णांच्या रक्ताची गरज भागवू शकतात.मात्र, त्याप्रमाणात रक्तदान होत नाही. महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १२ कोटी आहे. त्यानुसार १२ लाख रक्तदाते असणे गरजेचे आहे. विभागीय शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबादेत लहान-मोठे एक हजारांहून अधिक खाजगी रुग्णालये आहेत. मराठवाडा आणि शेजारील जिल्ह्यांतील रुग्ण शहरात उपचारासाठी येतात. त्यामुळे येथील रक्ताची मागणीही अधिक आहे. येथे दरवर्षी साधारणपणे ४० ते ५० हजार रक्त बॅग संकलन होते.यांना मिळणार मोफत रक्तथॅलेसिमिया आजाराचे रुग्णहिमोफेलियाचे रुग्णसिकलसेल अ‍ॅनेमिया आजाराचे रुग्णज्या आजारात रुग्णास जिवंत राहण्यासाठी वारंवार रक्त द्यावे लागते, अशा सर्व रुग्णांना मोफत रक्त द्यावे, असा शासन नियम आहे. त्यानुसार अशा रुग्णांना मोफत रक्त देण्याची जबाबदारी संबंधित रक्तपेढीची आहे.