उस्मानाबाद : येथील जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदात्यांना रूग्णालय प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते. या आवाहनाला उस्मानाबादकरांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेसह उपळा येथील तब्बल १७५ युवकांनी रक्तदान केले आहे.
जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत रक्तसाठा नसल्याने रूग्णांचे हाल होत होते. या अनुषंगाने रक्तदानासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. या हाकेला कार्यकर्त्यांनी ओ देऊन समाजकार्यातही आपण अग्रभागी असल्याचे दाखवून दिले आहे. माजी खा. डॉ. पद्मसिंह पाटील यांनी ७६ व्या वर्षी रक्तदान करून कार्यकर्त्यांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा दिली. त्यानंतर मनोज जगताप, राजसिंह राजेनिंबाळकर, अजिंक्य बिराजदार, अविनाश जाधव, अजित देवकर, लक्ष्मण माळी, अमोल राजेनिंबाळकर, आशिष पाटील, राहुल सूर्यवंशी, अमित पडवळ, रजनीकांत चटणे, रमजान तांबोळी, किरण नायकल, सागर शिंदे, बबलू राऊत, महादेव सूर्यवंशी, संभाजी सूर्यवंशी, अतुल मेटे, बालाजी शिंदे, अभय नायकल ओम नाईकवाडी, सचिन माळी, शिवाजी क्षीरसागर, संदीप मगर यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६१ कार्यकर्त्यांनी पुढाकार घेऊन रक्तदान केले.
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधीर पाटील यांच्यासह ५४ शिवसैनिकांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन रक्तदान केले. यावेळी शिवसेनेचे माजी उपजिल्हा प्रमुख प्रदीप साळुंके, अॅड. रामेश्वर शेटे, राजाभाऊ घोडके, श्रीकांत देशमुख, पांडु भोसले, बापू साळुंके, बाबा बागल, बापू शिंदे, पप्पू मुंडे, धनू जाधव, बप्पा उंबरे, प्रवीण शेटे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
तालुक्यातील उपळे (मा) येथील साठ युवकांनी जिल्हा रूग्णालयात जाऊन रक्तदान केले. या उपक्रमासाठी सुहास घोगरे, दशरथ पाटील, शहाजी पडवळ, विकी सोनटक्के, युवराज जाधव, अशिष डावकरे, नारायण हुकिरे, अमोल गोरे, रामेश्वर तोडकरी, बापू पवार, महेबूब शिंदे, सचिन लोंढे आदींनी पुढाकार घेतला. जिल्हा रूग्णालयातील रूग्णांची हेळसांड थांबावी, यासाठीच या उपक्रमाचे आयोजन केल्याचे या युवकांनी सांगितले. (प्रतिनिधी)
रक्तदानासाठी पुढाकार
By admin | Updated: July 31, 2014 00:45 IST
उस्मानाबाद : येथील जिल्हा रूग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याने रक्तदात्यांना रूग्णालय प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले होते.
रक्तदानासाठी पुढाकार
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}