शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा प्रदेशाध्यक्षांची गुप्त बैठक

By admin | Updated: June 19, 2014 00:21 IST

हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हिंगोली येथे भेट देऊन एका माजी आमदारांच्या घरी गुप्त बैठक घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

हिंगोली : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच हिंगोली येथे भेट देऊन एका माजी आमदारांच्या घरी गुप्त बैठक घेतल्याने जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. लोकसभा निवडणुकीपासून जिल्ह्यातील राजकारणाने अनपेक्षितपणे वळण घेतले आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जिल्ह्यातील राजकारणाची जी समीकरणे होती, ती आता पूर्णत: बदलली आहेत. जशी-जशी विधानसभेची निवडणूक जवळ येत आहे, तसतशा राजकीय घडामोडीही वाढत आहेत. भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष फडणवीस सोमवारी हिंगोली येथे आले होते. त्यांच्या दौऱ्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनाही नव्हती. परळीहून नागपूरकडे कारने निघालेले आ. फडणवीस सोमवारी हिंगोली येथे एका माजी आमदारांच्या निवासस्थानी चहा घेण्यासाठी थांबले. यावेळी जिल्ह्याच्या राजकारणावर बरीच चर्चा झाली. विधानसभेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून झालेल्या या चर्चेमुळे आगामी काळात पुन्हा राजकीय गणिते बदलतील, असे जाणकारांचे मत आहे. आ. फडणवीस यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीस मोजकेच नेते उपस्थित होते. अत्यंत गुप्तपणे ही बैठक का घेण्यात आली? असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीला देशभरात जे यश मिळाले, तेच यश आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाला मिळावे, यासाठी प्रदेशाध्यक्ष फडणवीस जोमाने कामाला लागले आहेत. हिंगोली जिल्ह्यात भाजपाची फारशी ताकद नाही. जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाचा एकही सदस्य निवडून येऊ शकला नाही. वसमतचे नगराध्यक्षपद युतीतील समझोत्यानुसार सध्या भाजपाकडे आहे. या पालिकेत केवळ भाजपाचे ५ सदस्य आहेत. तर हिंगोली नगर पालिकेत केवळ २ सदस्य आहेत. कळमनुरी पालिकेत तर भाजपाला खातेही उघडता आलेले नाही. राष्ट्रीय स्तरावरील पक्षाची जिल्ह्यातील दयनिय अवस्था संपविण्यासाठी आ. फडणवीस यांनी कंबर कसली आहे. त्याच अनुषंगाने त्यांनी जिल्ह्यात पक्ष मजबूत करण्यासाठी तयारी सुरू केली असल्याचे समजते. त्यामुळे आगामी काळात जिल्ह्यातील काही दिग्गज नेतेमंडळी भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. (जिल्हा प्रतिनिधी)काँग्रेस-राष्ट्रवादीही कामाला लागलीविधानसभा निवडणुकीच्या तयारीला काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस हे दोन्ही पक्ष लागले आहेत. हिंगोली विधानसभेची जागा काँग्रेसकडे असल्याने आ. भाऊराव पाटील गोरेगावकर यांनी त्या अनुषंगाने तयारी सुरू केली आहे. तर वसमतमध्ये राष्ट्रवादीचे आ.जयप्रकाश दांडेगावकर यांनी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी वाढविल्या आहेत. जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून नवनिर्वाचित काँग्रेसचे खा. राजीव सातव व राष्ट्रवादीचे नवनियुक्त विधान परिषदेचे सदस्य रामराव वडकुते यांचा एकत्रितरित्या जाहीर सत्कार करण्यात आला. असे असले तरी वडकुते यांनी मात्र राष्ट्रवादीने स्वबळावर विधानसभेची निवडणूक लढवावी, असे वैयक्तिक मत व्यक्त केल्याने काँग्रेसचे कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. शिवाय हा चर्चेचाही विषय झाल्याचे दिसून येत आहे. दौऱ्याची भाजपा नेत्यांनाही माहिती नाही जिल्ह्यात दयनीय अवस्था असलेल्या भाजपाची ताकद वाढविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी कसली कंबर.विधानसभा निवडणुकीत भाजपाला लोकसभा निवडणुकीप्रमाणे यश मिळावे, यासाठी सुरू केले प्रयत्न. येत्या काही दिवसांमध्ये जिल्ह्यात काही दिग्गज नेतेमंडळी भाजपामध्ये प्रवेश करण्याची शक्यता.जिल्ह्यात राजकीय घडामोडी वाढू लागल्या.