शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
3
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
4
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
5
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
6
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
7
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
8
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
9
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
10
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
11
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
12
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
13
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
14
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
15
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
16
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
17
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
18
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
19
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
20
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
Daily Top 2Weekly Top 5

कडवी झुंज! सिल्लोडमध्ये अब्दुल सत्तार यांचा ‘चौकार’ सुरेश बनकर रोखतील का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 19:53 IST

अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल.

- श्यामकुमार पुरेसिल्लोड : विधानसभा मतदारसंघात २००९ ते २०१९ सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेल्या अब्दुल सत्तार यांनी सरत्या मंत्रिमंडळात कृषी, पणन, अल्पसंख्याक मंत्री व पालकमंत्री म्हणून काम केले आहे. त्यांच्यासमोर दोन वेळा पराभूत झालेले भाजपचे सुरेश बनकर यांनी उद्धवसेनेत प्रवेश करून शिवबंधन बांधून महाविकास आघाडीतर्फे उद्धवसेनेकडून उमेदवारी मिळविली आहे. दोघांत कडवी झुंज होताना दिसत आहे. अब्दुल सत्तार यांचा असलेला तगडा जनसंपर्क व विकासाच्या मुद्यावर ते निवडणूक लढत आहेत, तर सुरेश बनकर यांच्या मागे सहानुभूतीची लाट दिसत आहे. आता यात कोण बाजी मारतो हे आगामी काळात दिसेल.

अब्दुल सत्तार यांच्या जमेच्या बाजू :१) गेल्या १५ वर्षांत तीन वेळा आमदार, महसूल, कृषी, अल्पसंख्याक व पालकमंत्री अशा विविध खात्यांचे मंत्री असताना मतदारसंघात केलेली विकासकामे.२) मुरब्बी राजकारणी, तगडा जनसंपर्क, कार्यकर्त्यांची मोठी फळी३) ग्रामीण भागात केलेली विकासकामे४) लाडक्या बहिणीमुळे महिलांमध्ये असलेली सहानुभूती५) सर्वदृष्टीने सक्षम उमेदवार

अब्दुल सत्तार यांच्या उणे बाजू : १) प्रचारावर भाजपने टाकलेला बहिष्कार, शिवसेनेची एकाकी झुंज२) तीन वेळा निवडणूक आल्यानंतर विकासकामे झाली नसल्याचा आरोप, मुस्लिम समाजाची नाराजी३) सिल्लोड तालुक्यातील दहशतीचा मुद्दा४) महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दाखवलेली एकी आणि दानवे यांनी बनकर यांना दिलेले बळ५) एकवटलेले विरोधक

सुरेश बनकर यांच्या जमेच्या बाजू :१) गेल्या दोन निवडणुकीत पराभूत झाल्याने निर्माण झालेली सहानुभूती२) काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धवसेनेने ताकदीने दिलेले समर्थन३) रावसाहेब दानवे - अब्दुल सत्तार यांच्यातील वादाचा फायदा४) धनशक्ती विरुद्ध जनशक्ती असा प्रचार५) भाजपमधून मदत

सुरेश बनकर यांच्या उणे बाजू१) कार्यकर्त्यांच्या नेटवर्कचा अभाव२) उशिरा उमेदवारी जाहीर झाल्याने प्रचाराला कमी मिळालेला वेळ३) भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांचे सत्तार यांना मिळालेले छुपे सर्मथन४) लोकसभेतील मदतीची काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांच्याकडून सत्तार यांना परतफेड होणार असल्याची चर्चा५) सत्तार यांच्याविरोधात आक्रमक प्रचाराचा अभाव

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकsillod-acसिल्लोड