शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
2
...तर नसरापूरच्या नराधमाला १५ ते २१ दिवसांत फाशीची शिक्षा झाली असती- राज्याचे माजी गृहमंत्री
3
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
4
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
5
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
6
कडक निर्बंध, तरीही इराणचं तेल पोहचलं आशियात! अमेरिकेच्या डोळ्यात धूळ फेकत कसं निघालं जहाज?
7
दिल्लीत AC ब्लास्टने जैन कुटुंब संपलं; आईच्या छातीशी घट्ट बिलगलेला दीड वर्षांचा आरू अन् शेवटचा तो व्हिडिओ कॉल...
8
आईच्या जीवाभावाच्या मैत्रिणीनेच रचला १४ वर्षांच्या चिमुरड्याच्या हत्येचा कट; सीसीटीव्हीमुळे फुटलं भांडं!
9
CSK vs MI: अवघ्या २१ धावांची खेळी, तरीही सूर्यकुमार यादवने मोडला किरॉन पोलार्डचा विक्रम
10
Devendra Fadnavis : "राहुल गांधींना महिला विषयावर बोलण्याचा अधिकारच नाही", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका
11
"पप्पांनीच मम्मीला मारलं..."; पत्नीच्या मृतदेहाजवळ बसून ढसाढसा रडला, लेकीने केला पर्दाफाश
12
हे तर भन्नाटच! झोपा आणि बक्षीस जिंका; 'या' ठिकाणी रंगली अनोखी 'स्लीप कॉम्पिटिशन'
13
'मला जाळू नका आणि दफनही करू नका'; बहिणीची शेवटची इच्छा 'तिने' अशी केली पूर्ण; हाडांपासून बनवले विंड चाइम
14
पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृण खून; पत्नीही गंभीर जखमी; तिन्ही आरोपी स्वतःहून पोलिसांत हजर
15
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
16
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
17
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
18
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
19
"कायद्याच्या ताब्यात गेला, आता तो नराधम जगणार...", प्रवीण तरडेंनी व्यक्त केली खंत
20
सबका मालिक एक ! नीता अंबानी शिर्डीमध्ये... श्री साईबाबांच्या समाधीचे घेतले दर्शन (PHOTOS)
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणची अव्वा की सव्वा बिले

By admin | Updated: August 10, 2014 02:00 IST

महावितरणची अव्वा की सव्वा बिले

जालना : शहरात बहुतांश भागातील वीज ग्राहकांना महावितरणकडून अव्वा की सव्वा बिले देण्यात येत असल्याने ग्राहकांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या वाढीव रक्कमेच्या बिलांबाबत महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे गेल्यानंतर त्यांच्याकडूनही कानाडोळा केला जात असल्याने दाद मागावी कुणाकडे, असा प्रश्न ग्राहकांना पडला आहे. वाढीव रक्कमेची बिले आल्याच्या अनेक तक्रारी दररोज महावितरणच्या कार्यालयात येत आहेत. मात्र संबंधित अधिकारी बेफिकिरपणे उत्तरे देत असल्याने ग्राहकांमध्ये नाराजी पसरत आहे. प्रत्येक घरगुती ग्राहकाने आपले मीटर घरासमोर लावणे आवश्यक आहे. परंतु घरासमोर मीटर असतानाही ज्या एजन्सीला मीटर रिडींग नोंद घेण्याचे काम दिले, त्यांच्याकडून ते घेतले जात नसल्याचे प्रकार समोर येत आहेत. जुना जालन्यातील गणपती गल्ली भागात बाबासाहेब सुपारकर यांच्याकडे किरायाने असलेल्या तीन ग्राहकांना संयुक्तपणे आॅगस्ट २०१३ ते जून २०१४ या कालावधीत १०० युनिट दराचे बिल आहे. मात्र जुलै २०१४ मध्ये अचानक ३४ हजार २३० रुपयांचे बिल आले. याच भागातील विलास राखे यांनाही सुमारे वर्षभर अंदाजे युनिटचे बिल येत गेले. नंतर एकाचवेळी वाढीव बिल आले. औरंगाबाद रोडवरील हॉटेल व्यावसायिक मोहन इंगळे यांना ८ महिन्यांच्या युनिटचे बिल एकाचवेळी मिळाले. घायाळनगर भागातील शिवाजीराव जावळे यांना एका मीटरवर २९०० रुपये बिल दरमहा येत होते. त्यांनी आणखी एक मीटर घेतले, तेव्हाही दोन्ही मीटरला प्रत्येकी तेवढेच बिल आले. टाऊनहॉल परिसरातील एकबाल कुरैशी यांचा वापर दरमहा ठराविक युनिटचाच आहे. मात्र अचानक त्यांना वापराच्या दुप्पट युनिटचे बिल आले. नवीन मोंढा रोडवरील सिंधी कॉलनीतील विजय मोटवाणी यांना दरमहा १००० ते १५०० रुपये बिल येते. मात्र त्यांना अचानक ६००० रुपयांचे बिल आले.अंबडरोडवरील राजपुतवाडी भागातील दत्तात्रेय पाथरकर यांनाही दरमहा वीज वापराच्या दुप्पट बिल आहे. मात्र त्याकडे महावितरणचे दुर्लक्ष होते. या ग्राहकांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तेव्हा ‘तुम्ही मीटरमधील युनिट पाहात नाहीत का, बिल आणि चालू युनिट यामधील अंतर समजत नाही का ’ असे प्रतिसवाल केले जातात. हे बिल तुम्हाला भरावेच लागेल असे सांगत फारतर हप्ते पाडून देऊ अशी सहानुभूती देण्याचा प्रयत्न करतात. वास्तविक सदरचे बिल वाढीव आहे, असे ग्राहक सांगत असतानाही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. वीज बिलावर रिडिंगच्या कॉलममध्ये ‘आरएनए’ असे लिहून आल्यास तेथील रिडिंग संबंधित एजन्सीच्या कर्मचाऱ्यास उपलब्ध झाले नाही, असा दावाही महावितरणचे अधिकारी करतात. (प्रतिनिधी)