शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
2
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
3
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
4
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
5
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
6
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
7
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
8
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
9
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
10
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
11
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
12
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
13
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
14
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
15
‘स्लीपर वंदे भारत’ जगात स्वस्त! चीन, अमेरिकेत हायस्पीड ट्रेनचे तिकीट किती? आकडे अवाक् करतील
16
नव्या आर्थिक वर्षात टाटा मोठा धमाका करणार! लवकरच ६ नव्या 'ढासू' कार बाजारात आणणार; बघा संपूर्ण प्लॅन
17
हॉटेलची रूम दिसते चकाचक, पण टॉयलेट सीटपेक्षा घाणेरड्या असतात 'या' गोष्टी; वापरताना सावधान
18
महिलांना दरमहा ३००० रुपये, मोफत बस प्रवास अन्...! सुवेंदू सरकार ॲक्शन मोडवर, १ जूनपासून खात्यात जमा होणार पैसे
19
"रस्त्यावर नमाज पठण चालणार नाही, प्रेमाने सांगून ऐकलं नाही तर..."; मुख्यमंत्री आदित्यनाथ यांचा इशारा 
20
IPL 2026 सुरू असताना धोनी अचानक NSG कॅम्पमध्ये; कमांडोंसोबत केला नेमबाजीचा सराव (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

मोठी चोरी! परभणी जिल्ह्यात गॅस सिलिंडरच्या गोडावूनवर दरोडा; ५५ टाक्यांसह गाडीही पळवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2026 18:58 IST

खवणे पिंपरी येथील गोडावूनमधून ५५ गॅस सिलिंडर लंपास; शटर तोडून चोरट्यांचा डल्ला.

सेलू (जि. परभणी): सेलू तालुक्यातील खवणे पिंपरी येथील एका शेतातील गोडावूनमधून ५५ गॅस सिलिंडर चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार रविवारी सकाळी उघडकीस आला आहे. चोरट्यांनी गोडावूनचे शटर तोडून ५५ सिलिंडरसह एक चारचाकी अ‍ॅपे वाहन आणि लॅपटॉप चोरून नेला आहे. या घटनेमुळे ग्रामीण भागातील गॅस वितरकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पाथरी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद देण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, खवणे पिंपरी येथे 'रुही इंडियन गॅस एजन्सी'चे गोडावून मधुकर चव्हाण यांच्या शेतात भाड्याने घेतलेल्या जागेत आहे.

रात्रीच्या सुमारास शटर तोडून डल्ला
शनिवारी रात्री गोडावूनला कोणीही नसताना चोरट्यांनी संधी साधली. गोडावूनमध्ये एकूण १३० सिलिंडरचा साठा होता, त्यापैकी चोरट्यांनी ५५ सिलिंडर लंपास केले. केवळ सिलिंडरच नाही, तर तिथे असलेले वाहन आणि महत्त्वाचा डेटा असलेला लॅपटॉपही चोरून नेला आहे. रविवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास जेव्हा कर्मचारी गोडावूनवर पोहोचले, तेव्हा शटर तुटलेले दिसल्याने हा प्रकार समोर आला.

पाथरी पोलिसांत धाव
या एजन्सीचा परवाना प्रणव परळीकर (रा. परळी) यांच्या नावे असून, या माध्यमातून खवणे पिंपरी, देऊळगाव गात, गुगळी धामणगाव आणि लाडनांदरा या ग्रामीण भागांत गॅस वितरण केले जाते. घटनेची माहिती मिळताच पोलीस पाटील गणेश पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. या चोरीप्रकरणी पाथरी पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद देण्यात आली असून, पोलीस आता चोरट्यांचा शोध घेत आहेत.

गॅस टंचाईच्या काळात चोरीचे संशयास्पद वळण
सध्या बाजारपेठेत गॅस सिलिंडरची मागणी मोठी असताना, एवढ्या मोठ्या प्रमाणात सिलिंडर चोरीला जाणे हे एखाद्या संघटित टोळीचे काम असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चोरीला गेलेले वाहन कोणत्या दिशेला गेले, याचा तपास करण्यासाठी पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची मदत घेत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Parbhani Gas Cylinder Depot Robbed: 55 Cylinders, Vehicle Stolen!

Web Summary : A daring theft occurred in Parbhani district's Selu, where 55 gas cylinders, a four-wheeled vehicle, and a laptop were stolen from a gas agency godown. Pathari police are investigating this major incident.
टॅग्स :LPG Gas Crisisएलपीजी गॅस टंचाईparabhaniपरभणी