शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

बीडकरांच्या आरोग्याची नगर परिषदेने घेतली दखल

By admin | Updated: May 8, 2014 00:02 IST

बीड : बीड शहरातील सुमारे चार लाख लोकांना न.प.कडून दूषितपाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून मंगळवारी प्रकाशित करण्यात आले होते.

 बीड : बीड शहरातील सुमारे चार लाख लोकांना न.प.कडून दूषितपाणीपुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ मधून मंगळवारी प्रकाशित करण्यात आले होते. याची दखल घेत नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाने अशुद्ध पाणी पुरवठा करणार्‍या ईट येथील जलशुद्धीकर प्रकल्पाची पाहणी करून हा प्रकल्प स्वच्छ करून घेतला. बीड तालुक्यातील ईट जवळील २४ दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असणार्‍या जलशुद्धीकरण प्रकल्पातून बीड शहराला अशुुद्ध पाणी पुरवठा होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने ‘चार लाख लोकांच्या आरोग्याशी खेळ’ या मथळ्याखाली मंगळवारी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत नगराध्यक्षा डॉ. दीपा क्षीरसागर यांच्या आदेशानुसार मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड, अभियंता एम.एस.वाघ, पी.आर.दुधाळ यांनी आपल्या चमूसह बीड तालुक्यातील बिंदुसरा तलावाची पाहणी केली. याची पाहणी केल्यानंतर निलावाड यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकार्‍यांना सोबत घेऊन ईट जवळील जलशुद्धीकरण प्रकल्पास भेट दिली. बीड शहरातील नागरिकांना अशुद्ध पाणी पुरवठा होणार नाही, याची काळजी आम्ही घेऊ. जलशुद्धीकरण प्रकल्प साफसफाई करून नियमीत ब्लिचींग पावडर वापरण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्याधिकारी व्ही.बी.निलावाड यांनी सांगितले. जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या ठिकाणी काही मोनोब्लॉक (छोट्या मोटारी) गंजलेल्या स्थितीत आढळून आल्या होत्या. या मोटारीही एक महिन्याच्या आत बदलण्यात येणार असल्याचे अभियंता वाघ यांनी सांगितले. २५ किलो ब्लिचींग पावडर वापरण्याचे दिले आदेश बिंदुसरा प्रकल्प यावर्षी ओव्हरफ्लो न झाल्याने तलावातील घाण बाहेर निघाली नाही. निलावाड यांनी तलावाची पाहणी केल्यानंतर येथे प्रत्येक आठ तासाला २५ किलो ब्लिचिंग पावडर वापरण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.(प्रतिनिधी) जलशुद्धीकरण केले शुद्ध प्रकल्पास भेट दिल्यानंतर निलावाड, वाघ, दुधाळ यांनी तेथील कर्मचार्‍यांकडून फिल्टर शुद्ध करून घेतले. तसेच आठ तासाऐवजी सहा तासाला फिल्टरची सफाई करावी, अशा सूचना दिल्या.