शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
2
Election Results 2026 LIVE: पश्चिम बंगालमध्ये भाजपा सरकार स्थापन करणार; ममता बॅनर्जींसोबत 'खेला होबे'
3
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
4
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
5
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
6
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
7
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
8
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
9
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
10
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
11
केरळममध्ये भाजपाने खाते उघडले, 'या' मतदारसंघात कमळ फुलले, काँग्रेस, सीपीआयच्या उमेदवारांवर केली मात
12
Success Story: एकेकाळी काँक्रिटच्या जमिनीवर झोपायचे लक्ष्मी मित्तल; आता ₹२७०००० कोटींची नेटवर्थ, IPL टीमचेही बनले मालक
13
बंगालमध्ये बाबरी मशीद बांधणारे हुमायूं कबीर २ जागांवर लढत होते, निकालात त्यांचे काय झाले?
14
Airplane Accident: लँडिंग करतानाच विमानाची ट्रकला धडक; न्यूयॉर्क विमानतळाजवळील घटनेचा व्हिडीओ बघा
15
Baramati Election Result 2026: सुनेत्रा पवारांना रेकॉर्डब्रेक मतदान; अजित पवारांचा विक्रम मोडत जादुई आकडा पार, एकतर्फी विजयाच्या दिशेने वाटचाल
16
ममता बॅनर्जी वि. सुवेंदू अधिकारी...! भवानीपूरमध्ये आतापर्यंत सात फेऱ्या झाल्या, प्रत्येक फेरीचा निकाल आला...
17
'तीन'वरून ७७ वर आणि आता थेट १९०+ आमदार! भाजपाचा थक्क करणारा 'सक्सेस रेट'; पश्चिम बंगालमध्ये कसं फुललं 'कमळ'
18
असह्य वेदना पण लेकाने शिकावं ही एकच इच्छा; माऊलीचा 'हा' Video पाहून पाणावतील डोळे
19
तृणमूल काँग्रेस पराभवाच्या उंबरठ्यावर, ममता बॅनर्जी हताश, पण सोडली नाही विजयाची आस, कार्यकर्त्यांना केलं असं आवाहन
20
पाकिस्तानने संधीचं सोनं केलं! इराणच्या मजबुरीचा फायदा घेत खोऱ्यानं पैसा ओढला; आता पडणार नोटांचा पाऊस!
Daily Top 2Weekly Top 5

बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांचे नगरसेवक पद रद्द

By admin | Updated: November 20, 2014 00:47 IST

लातूर : मनपात अर्धशतकी आकडा गाठलेल्या काँग्रेसला आणखी एक झटका बसला. बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांचे दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणावरुन नगरसेविका पद रद्द झाले आहे.

लातूर : मनपात अर्धशतकी आकडा गाठलेल्या काँग्रेसला आणखी एक झटका बसला. बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांचे दोन पेक्षा जास्त अपत्य असल्याच्या कारणावरुन नगरसेविका पद रद्द झाले आहे. लातूर मनपात नगरसेवक डॉ. विजयकुमार अजनीकर यांच्या पक्षप्रवेशाने काँग्रेसचे संख्याबळ ५० झाले होते. परंतु काँग्रेसचा हा आनंद फार काळ टिकला नाही. शाहीन युन्नूस सलीम काझी या पराभूत प्रतिस्पर्धी उमेदवाराने वरिष्ठ जिल्हा दिवाणी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. २६ / ४/ २०१२ ला दाखल झालेल्या या अर्जात नगरसेविका बीबीहाजरा खय्युमखान पठाण यांना दोनपेक्षा जास्त अपत्य असल्याने त्यांचे सदस्त्व रद्द करण्याची मागणी केली होती. यावर वेळोवेळी सुनावण्या झाल्या. यात फिर्यादीची तक्रार ग्राह्य धरुन न्या. एस. एम. यल्लाटी यांनी नगरसेविका पठाण यांचे सदस्यत्व रद्दबातल केले. फिर्यादीच्या वतीने अ‍ॅड. धनंजय पाटील यांनी बाजू मांडली. तर नगरसेविका पठाण यांच्या बाजूने के. एस. राजुरे यांनी बाजू मांडली तर प्रशासनाचे वतीने एम. पी. राजुरे यांनी म्हणणे मांडले. (प्रतिनिधी)नगरसेविका बीबीहाजरा खय्युमखान पठाण या पद रद्द झालेल्या तिसऱ्या नगरसेविका ठरल्या. यापूर्वी प्रभाग क्रमांक ३१ चे नगरसेविका रजिया शेख यांना जातीच्या प्रमाणपत्रावरुन न्यायालयानेच अपात्र ठरविले होते. त्यानंतर प्रभाग १३ चे नगरसेवक आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. व्यंकट बेद्रे यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याने सदस्यत्व रद्द झाले. आता तिसऱ्या नगरसेवकाचे दोनपेक्षा जास्त अपत्याच्या कारणावरुन सदस्यत्व रद्द झाले आहे.