शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

अल्वपवयीन मुलाने घेतला तरुणाचा जीव

By admin | Updated: July 4, 2016 21:31 IST

विनापरवाना १६ वर्षीय मोटारसायकल चालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी पिसादेवी रोडवर घडला.

 ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. ४ : विनापरवाना १६ वर्षीय मोटारसायकलचालकाने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जोराची धडक दिली. या अपघातात तरुण ठार झाला. हा अपघात सोमवारी सकाळी पिसादेवी रोडवर घडला.नरेंद्रकुमार कामेश्वर सिंग (२६, मूळ,रा. बिहार, हल्ली मुक्काम पिसादेवी रोड) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, पिसादेवी रोड परिसरात राहणारा नरेंद्रकुमार हा तरुण वडिलांना सिडको एन-७ येथील आंबेडकरनगर चौकात सोडून घरी दुचाकीने (क्रमांक एमएच-२० डीएन ९०७२) घरी परत जात होता. त्याच वेळी विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीस्वाराने (क्रमांक एमएच-२० सीडी ८०२९) त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात नरेंद्र्र हे गंभीर जखमी झाले. तेथून जाणारे मनोज आगळे यांनी तातडीने त्यांना बेशुद्धावस्थेत घाटी रुग्णालयात दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी नरेंद्र यास तपासून मृत घोषित केले. याविषयी पोलीस उपनिरीक्षक ए.के. मोरीन यांनी सांगितले की, नरेंद्र यांच्या दुचाकीला धडक देणारा दुसरा दुचाकीचालक हा १६ वर्षीय मुलगा आहे. तो पळशी तांडा येथे राहतो. तो भाजीमंडईत जात असताना नरेंद्र यांना जोरात धडकला. या मुलाकडे वाहन चालविण्याचा परवाना नाही. त्याच्याविरोधात नरेंद्रच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा सिडको ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृताच्या मेहुण्याने पोलिसांत तक्रार नोंदविल्याचे त्यांनी सांगितले. अल्पवयीन मुलांकडे वाहन देऊ नका- पोलीस निरीक्षक आजकाल १५ ते १६ वर्षांची मुले, मुली दुचाकी चालविताना दिसतात. विनालायसन्स वाहन चालविणे आणि अल्पवयीन मुलांस वाहन चालविण्यास देणे गुन्हा आहे. विना लायसन्स असलेल्या व्यक्तीकडे वाहन देणे म्हणजे त्याच्या हातात शस्त्र देण्यासारखे असते. त्याच्या निष्काळजीपणामुळे अनेकांचे प्राण जाऊ शकतात. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांचे प्रथम वाहन चालविण्याचे लायसन्स काढावे आणि त्यानंतरच त्यांच्या ताब्यात वाहन द्यावे, असे आवाहन सिडको ठाण्याचे निरीक्षक कैलास प्रजापती यांनी केले आहे.