शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर हत्याकांड: लैंगिक अत्याचाराच्या आरोपींचा 'पॅरोल' कायमचा बंद होणार; CM फडणवीसांचे कडक निर्देश
2
ममता बॅनर्जी भवानीपूर नाहीतर नंदीग्राममधून पुन्हा आमदार बनू शकतात; काय आहे समीकरण...?
3
"हे खपवून घेणार नाही..."; पंतप्रधान मोदींनी सुनावलं, UAE वरील हल्ल्यात तीन भारतीय जखमी
4
दिग्गज कंपनी बायोकॉनच्या संस्थापक किरण मजुमदार शॉ यांनी निवडला उत्तराधिकारी; कोणाला देणार कंपनीची धुरा?
5
उत्तर प्रदेशमध्ये स्मार्ट प्रीपेड मीटर फेल झाले! योगी सरकार पुन्हा जुन्या पद्धतीवर आले, एक महिन्याने लाईट बिल देणार
6
'तरुणांच्या आयुष्याशी सरकारचा अक्षरशः खेळ', पोलीस भरती परीक्षेत खासगी पुस्तकातीलच प्रश्न जसेच्या तसे
7
पश्चिम बंगालमध्ये नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीचा मुहूर्त ठरला! 'या' तीन नावांची चर्चा
8
तीन पक्ष, तीन मतदारसंघ, अन् एकाच कुटुंबातील तिघांची बाजी, पत्नी, मुलगा आणि जावई बनले आमदार 
9
सिग्नल तोडण्यापासून ते अतिवेगापर्यंत, दंड माफ होऊ शकतो; मे महिन्यात या दिवशी लोक अदालत भरणार...
10
Latest Marathi News LIVE :पश्चिम बंगालच्या निकालाबद्दल अरविंद केजरीवालांना शंका, 'या' मुद्द्यावर ठेवले बोट
11
पराभवानंतरही टीवीकेसोबत सत्तेत येण्याची काँग्रेसला संधी; तामिळनाडूत सत्ता समीकरण कसं जुळणार?
12
'राजा शिवाजी' सिनेमाचा सीक्वल येणार? रितेश देशमुखने अखेर सांगितलं, म्हणाला- "अजून खूप..."
13
आता शौचालयात जाण्यासाठी फ्लायओव्हर बांधा! भोपाळ मनपाचा कारनामा चर्चेत, लोक संतप्त
14
नेपाळचे नवे पंतप्रधान बालेन शाह यांचा 'ओली' पॅटर्न; भारतासोबत पंगा घेणारे 'हे' २ मोठे निर्णय!
15
'राजा शिवाजी'साठी बॉलिवूड कलाकारांनी किती मानधन घेतलं? रितेश देशमुखचा गौप्यस्फोट, म्हणाला- "अभिषेक बच्चन..."
16
सावधान! अटलांटिक महासागरात मृत्यूचे तांडव; क्रूझवर 'हंताव्हायरस'चा शिरकाव, ३ पर्यटकांचा बळी!
17
स्मार्ट होम की मृत्यूचा सापळा? आग लागताच स्मार्ट लॉक खराब; दरवाजा न उघडल्याने ९ जणांचा बळी
18
एमजीआर, एनटीआर ते विजय... दक्षिणेतील मतदार अभिनेत्यांमध्ये नेता का शोधतात? ही आहेत ५ कारणं
19
बनावट जन्म दाखला घोटाळा: मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून SITद्वारे सखोल चौकशीचे आदेश
20
British Airways: विमान उडवायचं नाही, फक्त जमिनीवर चालवायचंय; 'ही' एअरलाइन कंपनी पायलट्सना देतेय ९५ लाखांची सॅलरी
Daily Top 2Weekly Top 5

भिजव पांडुरंगा हे तहानलेले रान रे...!

By admin | Updated: June 29, 2014 23:40 IST

रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला.

वारकऱ्यांचे माऊलीला साकडे : पावसाची दडी, शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवातअमरावती : रोहिणी व मृग नक्षत्र कोरडे गेले. आर्द्राने आशा दाखविली. प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांनी गुरूवारी आलेल्या एका पावसावर पेरणीला सुरुवात केली अन् पुन्हा वरूण राजा रुसला. पेरणीचा कालावधी संपत आहे, मागील पाच वर्षांत पहिल्यांदा पाऊस कमी पडला. वास्तविक पेरण्या आटोपून शेतकरी, वारकरी हे विठूरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. पांडुरंगाला समृद्धीचे साकडे घालतात अन् वारी करून आल्यावर पीक हे चांगलंच वर आलेलं असतं. तेव्हा डवरणी, निंदण आदी सोपस्कार आटोपतात. परंतु यंदा मात्र याउलट झाले. वारकरी यंदा माऊलीकडे पेरणीयोग्य पाऊस पडावा म्हणून साकडे घालण्यासाठी निघाले आहे.नको पांडुरंगा मला सोन्या-चांदीचे दान रे।भिजव पांडुरंगा तहानलेले रान रे।।या काव्यात टाळ-मृदंगाच्या साथीने माऊलीच्या नामघोषात तल्लीन होऊन पांडुरंगाच्या दर्शनासाठी हजारो मैलाची पायपीट करीत शेतकरी, वारकरी पंढरीच्या वाटेने आहेत. माऊलीची दर्शनाची आस असलेला प्रत्येक शेतकरी पावसासाठी आर्जव करू लागला आहे. २० ते २५ जूनदरम्यान खरिपाची पेरणी व्हायला पाहिजे, त्याची आता जेमतेम सुरुवात झाली आहे. शेतकरी पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे.अमरावती जिल्ह्यात खरीप २०१४ हंगामासाठी ७०,२०,२०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. यापैकी ३,७३,००० हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी होणार आहे. कपाशीसाठी १,५९,००० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित आहे. जिल्ह्याच्या एकूण सरासरी क्षेत्राच्या ७५ टक्के क्षेत्रावर कपाशी व सोयाबीनची पेरणी होणार आहे. तसे पाहता विदर्भातील खरिपाची पेरणी २० ते २५ जून दरम्यान दरवर्षी संपुष्टात येते अन् शेतकरी पांडुरंगाच्या दर्शनाला जातो. यंदा मात्र चित्र उलट आहे. जिल्ह्यात केवळ ४० मि.मी. सरासरी पाऊस पडला आहे. किमान ६५ मि.मी. पाऊस पडल्याशिवाय पेरणी करू नये, असा कृषी विभागाचा सल्ला आहे.