शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भर दिवसा दोन घरे फोडली

By admin | Updated: May 26, 2014 00:31 IST

जालना: जूना जालना भागात रविवारी भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी दोन घरफोड्या करून ३२ हजारांचा ऐवज लंपास केला

 जालना: जूना जालना भागात रविवारी भरदिवसा दोन वेगवेगळ्या ठिकाणी चोरट्यांनी दोन घरफोड्या करून ३२ हजारांचा ऐवज लंपास केला. दोन्ही चोर्‍या दुपारच्या वेळी झाल्याने पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान उभे केले आहे. यातील पहिली चोरी नूतनवसाहत भागातील राममंदिर परिसरातील रहिवासी विनायक रामराव आचार्य यांच्या घरी झाली. त्यांचे आई व वडील राममंदिरात दर्शनासाठी गेले होते. घराला कुलूप पाहून दुपारी १२. ३० ते १ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडले. आत प्रवेश करून घरातील कपाट फोडून त्यातील रोख दहा हजार रूपये लंपास केले. दुसरी घटना हरीओम नगर भागात घडली. येथील शाम सदावर्ते हे बाहेर गावी गेलेले असल्याने घराला कुलूप होते. ते रविवारी दुपारी ३ ते ५ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी तोडले व घरात प्रवेश करून कपाट फोडून त्यातील सोन्या-चांदीचे दागिने असा एकूण २२ हजारांचा माल लंपास केला . या दोन्ही चोर्‍या प्रकरणी कदीम जालना पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरूद्ध वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. दोन्ही चोर्‍यांचा तपास सपोनि भंडारे हे करीत आहे. (प्रतिनिधी)लग्न समारंभात नऊ वर्षीय बालिकेचा विनयभंगपरतूर : परतूर शहरात एका लग्न समारंभात नऊ वर्षीय बालिकेचा विनयभंग झाल्याची घटना घडली.सदर बालिकेने आरोपीस ओळखल्याने त्यास अटक करण्यात आली आहे. परतूर शहरातील मोंढा भागातील बालाजी मंदिरात २५ रोजी सकाळी १० च्या दरम्यान एक विवाह सोहळा होता. या समारंभासाठी आपल्या ९ वर्षीय मुलीसह एक दाम्पत्य जालना येथून आले हाते. त्यांची मुलगी बाथरूमला गेली असता अरोपी केदार रामलाल अग्रवाल (वय २२ वर्षे, रा. बालाजी नगर परतूर) याने तेथे तिचा विनयभंग केला. कोणास सांगू नको म्हणून तोंड दाबून गळा दाबला. याप्रकरणी मुलीच्या पित्याच्या फिर्यादीवरून परतूर पोलिसात आरोपीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउपनि एम. बी. शेख हे करीत आहेत.