शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात

By admin | Updated: July 10, 2016 01:08 IST

औरंगाबाद : जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे.

औरंगाबाद : जुलैच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे मराठवाड्यातील कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी साठण्यास सुरुवात झाली आहे. शून्यावर आलेला विभागातील सरासरी उपयुक्त जलसाठा आठवडाभरातच दोन टक्क्यांच्या जवळ पोहोचला आहे. सद्य:स्थितीत विभागातील सर्व धरणांमध्ये १३५ दलघमी उपयुक्त जलसाठा झाला आहे.मराठवाड्यातील बहुतेक लहान मोठे प्रकल्प यंदा एप्रिल महिन्यातच कोरडे पडले होते. जूनच्या शेवटच्या आठवड्यात तर विभागातील सर्व प्रकल्पांमधील सरासरी उपयुक्त साठा शून्य टक्क्यावर आला होता. मात्र, गेल्या आठवड्यात मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक कोरड्या प्रकल्पांमध्ये पाणी आले आहे. लघु, मध्यम आणि मोठ्या अशा सर्वच प्रकल्पांतील जलसाठा किंचित वाढला आहे. मराठवाड्यात सध्या ११ मोठ्या प्रकल्पांमध्ये सरासरी एक टक्का जलसाठा आहे. विभागात मध्यम प्रकल्पांतील साठ्यात चांगल्या प्रमाणात भर पडली आहे. मराठवाड्यात एकूण ७५ मध्यम प्रकल्प आहेत. आता या प्रकल्पांमध्ये ३२ दलघमी म्हणजे सरासरी ३.४६ टक्के इतका जलसाठा झाला आहे. तर विभागातील ७३२ लघु प्रकल्पांमध्येही सरासरी ३.२१ टक्के जलसाठा आहे. विष्णूपुरी, निम्न दुधना आणि पेनगंगा प्रकल्पांचा अपवाद विभागातील आठही मोठ्या प्रकल्पांमध्ये सध्या शून्य टक्के उपयुक्त साठा आहे. दहा दिवसांपूर्वी विष्णूपुरी प्रकल्पातील जलसाठा ३ टक्क्यांपर्यंत खाली आला होता. तो आता १८ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. निम्न दुधना प्रकल्पात सध्या ७.३८ टक्के आणि पेनगंगा प्रकल्पात दोन टक्के उपयुक्त जलसाठा आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठे जायकवाडी धरण अद्यापही मृतसाठ्यातच आहे. जायकवाडीतील जिवंत साठा मार्च महिन्यातच संपलेला आहे. तेव्हापासून या धरणाच्या मृतसाठ्यातून पाणी वापर सुरू आहे. चालू आठवड्यात या धरणात १० दलघमीची आवक झाली आहे. असे असले तरी मृतसाठ्याची पातळी भरून धरण जिवंत साठ्यात येण्यासाठी आणखी २५२ दलघमी इतक्या पाणीसाठ्याची गरज आहे. त्यानंतरच या धरणाच्या जिवंत साठ्यात पाणी साठण्यास सुरुवात होणार आहे.