शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
3
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
4
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
5
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
6
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
7
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
8
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
9
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
10
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
11
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
12
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
13
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
18
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
19
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
20
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

मधमाशांना ‘परफ्यूम’चे आकर्षण; हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांतील पोळे हलवणार

By उदयकुमार जैन | Updated: June 6, 2025 12:57 IST

पर्यटकांवरील हल्ल्यानंतर युद्धपातळीवर हालचाली

उदयकुमार जैन, लोकमत न्यूज नेटवर्क, छत्रपती संभाजीनगर: आग्या मोहळच्या माश्यांना परफ्यूम अर्थात अत्तराच्या काही विशिष्ट फ्लेवर्सचे आकर्षण असते. शिवाय विडी-सिगारेटचा धूर, गोंगाट या कारणातूनही माश्या पर्यटकांवर हल्ले करतात. तीन दिवसांपूर्वी जगप्रसिद्ध अजिंठा लेणीतही तेच घडले. असे हल्ले रोखण्यासाठी अजिंठासह सर्व लेण्यांमधील आग्या मोहळचे पोळे जवळच जंगलात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मधमाश्यांचे पोळे वाचेल, शिवाय पर्यटकांवरील हल्लेदेखील थांबतील.

अजिंठा लेणीत मंगळवारी आग्या मोहळच्या माश्यांनी पुण्यातील ५० पर्यटकांवर हल्ला केला. गेल्या ४ महिन्यांत ८०० पर्यटकांवर मधमाश्यांनी हल्ला केला आहे. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक उपवन संरक्षक कार्यालयात मंगळवारी बैठक झाली. पुरातत्व विभाग आणि वन विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. लेणीत ८ ते १० पोळे आहेत.  वारंवार हल्ले करणारे तीन पोळे जवळच स्थलांतरित करण्याचा निर्णय या बैठकीत घतेली, अशी माहिती प्रादेशिक उपवनसंरक्षक सुवर्णा माने यांनी  दिली. 

प्रथमोपचाराचीही सुविधा नाही

हल्ला करणाऱ्या मधमाश्या या आग्या मोहळाच्या असल्याने त्याच्या वेदना जीवघेण्या असतात. अशा वेळी अजिंठा लेण्यांत प्रथमोपचारांचीही सुविधा नाही. रुग्णालयात जाऊनच उपचार घ्यावे लागतात.

पर्यटकांनी काय काळजी घ्यावी?

विशिष्ट परफ्यूम, रंगीबेरंगी कपडे याकडे कीटक, वन्यजीव व मधमाश्या आकर्षित होतात. त्यामुळे जंगलात किंवा लेण्यांसारख्या ठिकाणी जाताना परफ्यूम, असे कपडे वापरू नयेत. वन्यजीवांना गोंगाट आवडत नाही. त्यामुळे अशा ठिकाणी शांतता बाळगावी. विडी-सिगारेटच्या धुरामुळेदेखील मधमाश्या आक्रमक होऊ शकतात. हे सोबत नेणे टाळावे, असा सल्ला पर्यावरणतज्ज्ञ किशोर पाठक यांनी दिला. 

व्यावसायिक आर्थिक संकटात

शेकडो वर्षांपासून ही समस्या आहे. बऱ्याच वेळा स्थानिक पातळीवर यावर उपाय केला जायचा. परंतु आता कायदा, नियमांचा बाऊ करून याकडे दुर्लक्ष होत आहे. मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे वाईट संदेश जात आहे. यामुळे पर्यटकांची संख्या कमी व्हायला नको. स्थानिक व्यावसायिक यामुळे धास्तावले आहेत, असे अजिंठा लेणी दुकानदार संघटनेचे अध्यक्ष पपिंद्रपालसिंग वाय. टी. यांनी सांगितले.

शिवनेरी किल्ल्यावरही अशीच समस्या होती, तेथे ज्या रेस्क्यू टीमने काम केले होते, त्यांच्याशी आमचा संपर्क सुरू आहे. लवकरच ही टीम मधमाश्यांना कुठलीही हानी न पोहोचवता पोळे स्थलांतरित करणार आहेत. -संतोष ठोडके, वनपरिक्षेत्र अधिकारी

अजिंठा प्रमाणेच वेरूळ, पितळखोरा, नाशिकच्या पांडव लेण्यांसह आमच्या अखत्यारीत येणाऱ्या सर्व लेण्यांत हीच समस्या आहे. त्यामुळे येथेही आग्या मोहळ पोळ जवळच्या जंगलात स्थलांतरित केले जाईल.  -मनोज पवार, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAjantha - Elloraअजंठा वेरूळ