पहिल्याच दिवशी बीडने गाजवले वर्चस्व

By Admin | Updated: January 6, 2015 01:08 IST2015-01-06T00:27:15+5:302015-01-06T01:08:43+5:30

बीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला सोमवारी बीडमध्ये सुरूवात झाली़ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध खेळांमध्ये बीडच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले़

Beed played domination on the very first day | पहिल्याच दिवशी बीडने गाजवले वर्चस्व

पहिल्याच दिवशी बीडने गाजवले वर्चस्व


बीड : औरंगाबाद परिक्षेत्रीय पोलीस क्रीडा स्पर्धेला सोमवारी बीडमध्ये सुरूवात झाली़ स्पर्धेच्या पहिल्या दिवशी विविध खेळांमध्ये बीडच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवले़
पोलीस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी, अपर अधीक्षक माधव कारभारी, उपअधीक्षक अभय डोंगरे, सुधीर खिरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली येथे पोलीस कवायत मैदानावर स्पर्धेला सुरूवात झाली़ दहा हजार मीटर धावणे या क्रीडा प्रकाराने स्पर्धेची सुरूवात झाली़ यामध्ये बीडच्या रामा खेत्रे याने बाजी मारत प्रथम क्रमांक तर कानडेने तृतीय क्रमांक पटकावला़ २०० मीटर धावण्यात महिलांमध्ये ललिता साळवे या बीडच्या खेळाडूने प्रथम क्रमांक मिळविला़ मैदानी खेळातही बीड मागे राहिले नाही़ खो-खो महिला व पुरूष, व्हॉलीबॉल, हँडबॉल या खेळांमध्ये बीडने आपले वर्चस्व गाजविले़
बीडनंतर उस्मानाबाद, औरंगाबाद येथील खेळाडूंनी स्पर्धेवर छाप पाडली़ स्पर्धेसाठी आलेल्या खेळाडूंची बीड जिल्हा पोलीस दलाच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे़ मैदानावर अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे़ या स्पर्धा कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी पाच ते आठ कर्मचारी नेमले होते़
शेख बाबर, लतीफ खान पठाण, सोमनाथ कुंभार, पांडूरंग पवार, उगलमुगले यांची स्पर्धा नियोजनासाठी नेमणूक केली आहे़ औरंगाबाद शहर, ग्रामीण, जालना, उस्मानाबाद आणि बीडचे खेळाडू या स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत़
सकाळी सुरू झालेल्या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांची झुंबड उडाली होती़ अनेकजण आपल्या सहकाऱ्याला प्रोत्साहन देत होते़ रात्री उशिरापर्यंत या स्पर्धा सुरू होत्या़ (प्रतिनिधी)

Web Title: Beed played domination on the very first day