गुढ आवाजाने बीड शहर हादरले

By Admin | Updated: August 18, 2015 23:46 IST2015-08-18T23:46:55+5:302015-08-18T23:46:55+5:30

बीड : शहर परिसरात गुढ आवाज झाल्याने परिसर हादरला. मंगळवारी सकाळी ९:२० वाजण्याच्या दरम्यान हा आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील घरांना

Beed city shook with a crude voice | गुढ आवाजाने बीड शहर हादरले

गुढ आवाजाने बीड शहर हादरले


बीड : शहर परिसरात गुढ आवाज झाल्याने परिसर हादरला. मंगळवारी सकाळी ९:२० वाजण्याच्या दरम्यान हा आवाज झाला. आवाजामुळे परिसरातील घरांना हादरा बसला असल्याचे नागरीकांनी सांगितले. अचानक झालेल्या आवाज नेमका कशाचा हे पहाण्यासाठी नागरीक घराबाहेर पडले होते. यावेळी एकच गोंधळ उडाल्याचे चित्र पहावयास मिळाले.
मागील सहा महिन्यात अशा प्रकारे गुढ आवाज होण्याचे प्रमाण वाढत आहे. यामध्ये आष्टी, पाटोदा, शिरूर कासार तालुक्यात जास्त गुढ आवाज होतात. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांना याबाबत विचारले असता त्यांनी सांगितले की, पृथ्वीच्या पोटातील हवेचा दाब पाणी पडल्यामुळे बाहेर हवा येताना अशा प्रकारचे आवाज होऊ शकतात. घाबरण्याचे कारण नसल्याचे निऱ्हाळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. (प्रतिनिधी)
जिल्ह्यातील गेवराई व शिरूर कासार तालुक्यात गूढ आवाज ऐकू येण्याचे प्रमाण अधिक आहे.
४भूगर्भात पोकही निर्माण झाल्यामुळे हे आवाज होत असल्याचा दावा प्रशासन गेल्या वर्षभरापासून करीत आहे.
४मात्र, यापूर्वी प्रशासनाकडून कोणतेही उत्तर येत नसल्यामुळे बाँबची चाचणी होत असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये असायची.

Web Title: Beed city shook with a crude voice