शहरं
Join us  
Trending Stories
1
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
2
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
3
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
4
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
5
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
6
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
7
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
8
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
9
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
10
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
11
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
12
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
13
ह्युंडाई स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणणार, काय काय फीचर्स असणार? टाटा पंच EV सह या कारना देणार टक्कर
14
जबरदस्त! १३८० किमी धावणार अन् तीन चाकांवरही पळणार! 'ही' नवी हायटेक इलेक्ट्रिक कार ऑटो विश्वात धुमाकूळ घालणार?
15
रशियाचे परराष्ट्र मंत्री PM मोदींना भेटले; तेल संकट, युक्रेन, परस्पर संबंध वाढवण्यावर चर्चा
16
देशातील परिस्थिती गंभीर, सर्वपक्षीय बैठक बोलवा, त्यात पंतप्रधानांनी हजर राहावे- शरद पवार
17
ममता बॅनर्जी खरंच वकील आहेत का, कागदपत्र सादर करा; बार कौन्सिलचे निर्देश, झाले तरी काय?
18
Vaibhav Suryavanshi In India A Squad : वैभव सूर्यवंशीला BCCI चं मोठं गिफ्ट; भारतीय ‘अ’ संघात निवड
19
HSRP बसवली नाही तर कडक कारवाई, नियमभंग केल्यास मोठा दंड होणार; किती शुल्क आकारले जाणार?
20
सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, राष्ट्रवादी काँग्रेसच्या बड्या नेत्याचा राजीनामा; पत्रात काय?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांसाठी प्राधिकरण

By admin | Updated: January 19, 2015 00:56 IST

ग्राहक संरक्षणाच्या संदर्भातील अस्तित्वात असलेले कायदे अधिक सक्षम करून ग्राहक हिताला बाधा पोहोचविणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाची स्थापना करणार असल्याची


हणमंत गायकवाड , लातूर
शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने बळीराजा सबलीकरण अभियान सुरू केले असले, तरी कार्यशाळा आणि व्याख्यानापलिकडे अभियान पुढे सरकले नाही. शिवाय, शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या या हेल्पलाईनचा रिसिव्हर उचलायला रविवारी कार्यालयात कोणीही नसल्याने अभियानाच्या उपाययोजनेला खो बसत आहे.
दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी गळफास घेतला आहे. लातूर जिल्ह्यात ६६ च्या वर शेतकऱ्यांनी गेल्या वर्षभरात आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ‘जगण्याबद्दल बोलू काही’ या कार्यक्रमांतर्गत बळीराजा सबलीकरण अभियान सुरू केले आहे. १५ दिवसांपूर्वी अभियानानिमित्त एक कार्यशाळा घेण्यात आली. मात्र दीर्घकालीन उपाययोजना या अभियानाने अद्याप सुचविल्या नाहीत. प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयात आपत्ती व्यवस्थापनाची १०७७ ही हेल्पलाईन सेवा शेतकऱ्यांच्या मदतीसाठी खुली केली आहे. गेल्या ११ जानेवारीपासून या हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचे गाऱ्हाणे जाणून घेतले जात आहे. ११ जानेवारीपासून दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी आपले गाऱ्हाणे या हेल्पलाईनवर मांडले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने जिल्हा परिषदेनेही शेतकऱ्यांसाठी २४२९९० या क्रमांकाची हेल्पलाईन मदतीला दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आपत्ती व्यवस्थापन कक्षातील हेल्पलाईनचा नंबर रविवारीही सुरू असतो. गाऱ्हाणे ऐकून घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडे ते पोहोचविले जाते. मात्र जिल्हा परिषदेचा हेल्पलाईन रिसिव्हर रविवारी कोणीच उचलत नाही. उचलला तर ‘आज सुटी’ असल्याचे सांगितले जाते. ‘लोकमत’ने रविवारी २ ते ५ वाजेपर्यंत ९ वेळा हेल्पलाईनचा २४२९९० हा भ्रमणध्वनी क्रमांक डायल केला. मात्र प्रतिसाद मिळाला नाही. दरम्यान, गटविकास अधिकाऱ्यांच्या ९४०३३२१००० या भ्रमणध्वनीवरहीसंपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांचाही भ्रमणध्वनी बंद होता. दोन्हीही हेल्पलाईनवर शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतले जातात. त्यासाठीच ही हेल्पलाईन आहे. मात्र रविवारी जि.प.च्या हेल्पलाईनवर प्रतिसाद मिळत नाही. शेतकऱ्यांना दीर्घकालीन उपाययोजना, आपत्कालीन उपाययोजना, नैराश्य, उदासिनता यावर मदत मिळावी म्हणून प्रशासनाने ही हेल्पलाईन सुरू केली. ‘चला, जगण्याबद्दल बोलू काही’ असे सांगणाऱ्या प्रशासनाची हेल्पलाईनची सेवा मात्र रविवारी बंद असते.
सातबारावरील बोजा हटविणे, कृषी व्याजावरील व्याजदरात दुरुस्ती करणे, ग्रामदिनातून एकाच दिवशी समस्या गावात सोडविणे, गावा-गावांत मानसशास्त्रीयदृष्ट्या समुपदेशन करणे आदी उपक्रम स्थानिक पातळीवर सुरू केल्याचा दावा प्रशासनाने केला असला, तरी रविवारी या यंत्रणेकडून मात्र प्रतिसाद मिळत नाही.
४जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती कक्षातील हेल्पलाईनचा भ्रमणध्वनी उचलला. मात्र तोही सेवकाने घेतल्यामुळे इथे संवाद तरी होऊ शकला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील हेल्पलाईनवर आठ दिवसांत १५ कॉल आले असून, जमीन महसुलातील सूट, सहकारी कर्जाची पुनर्गठन, कर्जाच्या वसुलीबाबत, हवामान आधारित पीकविमा, आणेवारी, वीजबिलात सूट, खाजगी सावकाराबाबत, रोहयोची कामे, पाणीपुरवठा आणि शेती अनुदानाबद्दल शेतकऱ्यांनी या हेल्पलाईनवर संपर्क साधला असल्याचे आपत्ती व्यवस्थापनातील साकेब उस्मानी यांनी सांगितले.