फॉलोअर्ससाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण! जुना व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल, तरुणाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 12:51 IST2026-04-17T12:50:21+5:302026-04-17T12:51:29+5:30

क्रांतीचौक पोलिसांची मोठी कारवाई; आरोपीला छत्रपती संभाजीनगरची नारेगावमधून अटक

Aurangzeb's glorification for followers! Old video deliberately goes viral, youth arrested in chhatrapati sambhajinagar | फॉलोअर्ससाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण! जुना व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल, तरुणाला अटक

फॉलोअर्ससाठी औरंगजेबाचे उदात्तीकरण! जुना व्हिडिओ जाणीवपूर्वक व्हायरल, तरुणाला अटक

छत्रपती संभाजीनगर: शहरात पुन्हा एकदा औरंगजेबाचे पोस्टर झळकवून सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न समोर आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाचतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्याप्रकरणी नुमान अजहर शेख (रा. सब्जीमंडी, पैठण गेट) याला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे. सोशल मीडियावर फॉलोअर्स वाढवण्यासाठी आपण हे कृत्य केल्याची कबुली आरोपीने दिली आहे.

जाणीवपूर्वक व्हिडिओ केला व्हायरल
मिळालेल्या माहितीनुसार, 'MR_NOMANSHAIKH03' या नावाने सोशल मीडिया प्रोफाइलवर नुमानने मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर घेऊन नाचतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ व्हायरल होताच शहरात संतापाची लाट उसळली. उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी तातडीने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी केली. सायबर पोलिसांनी तांत्रिक तपास करून नारेगाव परिसरातून नुमानला ताब्यात घेतले.

दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा ठपका
पोलिसांच्या तपासात असे निष्पन्न झाले की, नुमानने जाणीवपूर्वक जुना व्हिडिओ यंदाच्या १४ एप्रिलच्या पार्श्वभूमीवर पोस्ट केला होता. दोन समाजात शत्रूत्व आणि द्वेषभावना निर्माण करण्याच्या उद्देशाने हे कृत्य केल्याचा ठपका ठेवत त्याच्यावर कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वीही शहरात अशा घटना घडल्या असून, पोलिसांनी अशा प्रवृत्तींविरुद्ध कडक पवित्रा घेतला आहे.

यापूर्वीही अशा घटनांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न
- मार्च २०२३ मध्ये शहर नामांतर आंदोलनात कार्यकर्त्यांनी औरंगजेबाचे पोस्टर झळकावले होते. या प्रकरणी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
- जून २०२३ मध्ये कोल्हापूर आणि अहिल्यानगरमध्ये औरंगजेबाच्या फोटोंवरून तणाव निर्माण झाल्यानंतर शहरात त्याचे पडसाद उमटून काही ठिकाणी पोस्टर्सवरून वाद निर्माण झाला होता. यात पोलिसांनी सिटी चौक पाेलिस ठाण्यात समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी कलम १५३ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये एका धार्मिक मिरवणुकीत औरंगजेबाचे पोस्टर झळकावले होते.

Web Title : फ़ॉलोअर्स के लिए औरंगज़ेब का महिमामंडन! पुराना वीडियो जानबूझकर वायरल, युवक गिरफ्तार

Web Summary : छत्रपति संभाजीनगर में सोशल मीडिया फ़ॉलोअर्स पाने के लिए औरंगज़ेब का महिमामंडन करने वाला वीडियो पोस्ट करने पर युवक गिरफ्तार। सांप्रदायिक वैमनस्य भड़काने के लिए उसने जानबूझकर एक पुराना वीडियो इस्तेमाल किया, जिसके कारण उसकी धारा 153(A) के तहत गिरफ्तारी हुई।

Web Title : Aurangzeb Glorification for Followers! Old Video Purposely Viral, Youth Arrested

Web Summary : Youth arrested in Chhatrapati Sambhajinagar for posting a video glorifying Aurangzeb to gain social media followers. He intentionally used an old video to incite communal discord, leading to his arrest under Section 153(A).