शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांबद्दलच्या आक्षेपार्ह वक्तव्याचे औरंगाबादेतही हिंसक पडसाद, उस्मानपुरातील भाजपाचे कार्यालय फोडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2018 20:21 IST

अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे औरंगाबादमध्येही पडसाद उमटले आहेत.

ठळक मुद्देअहमदनगरमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. नगर शहरात पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप शिंदे यांच्यासह छिंदम याच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली.

औरंगाबाद - अहमदनगर महापानगरपालिकेचे उपमहापौर श्रीपाद छिंदम याने शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचे औरंगाबादमध्येही पडसाद उमटले आहेत. औरंगाबादमधील उस्मानपुरातील भाजपाचे कार्यालय फोडण्यात आल्याचे वृत्त एबीपी माझाने दिले आहे तसेच मराठा संघटनांच्या कार्यकर्त्यांनी छिंदम यांच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन केले. 

अहमदनगरमध्येही या घटनेचे पडसाद उमटले. नगर शहरात पालकमंत्री राम शिंदे, खासदार दिलीप गांधी यांच्यासह छिंदम याच्या कार्यालयावर दगडफेक करण्यात आली. पाथर्डी येथे जुने बसस्थानक चौकात बसवर दगडफेक करण्यात आली. श्रीगोंदा येथे तहसील कार्यालयावर सर्वपक्षियांच्यावतीने मोर्चा काढण्यात आला. भाजपाच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. जामखेड येथे शिवसेनेच्यावतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढून भाजप व छिंदम यांचा निषेध करण्यात आला. पाथर्डी येथे पोलीस ठाण्यावर सर्वपक्षीयांनी मोर्चा काढला. छिदम याच्यावर गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवप्रेमींनी पोलीस ठाण्यातच ठिय्या दिला. 

तर काही संतप्त तरुणांनी जुन्या बसस्थानक चौकात दगडफेक करुन एसटी बसच्या काचा फोडल्या. शेवगाव येथेही शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने पोलीस ठाण्यावर मोर्चा नेऊन छिंदम याच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले़ भिंगार येथे सुमारे एक तास रास्ता रोको करण्यात आला. उद्या भिंगार बंदची हाक देण्यात आली आहे. केडगावमध्ये छिंदम याचा पुतळा जाळण्यात आला.

संगमनेर येथेही रास्तारोको करुन छिंदम याचा पुतळा जाळण्यात आला. राहुरी येथे नगर-मनमाड महामार्गावर सर्वपक्षियांनी रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे वाहनांच्या दुतर्फा रांगा लागल्या होत्या. दरम्यान पोलीस निरीक्षकांनी मध्यस्थी करीत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. नेवासा येथे विविध संघटनांच्यावतीने छिंदम याचा तिव्र निषेध नोंदविण्यात आला.