शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दर ५३ मिनिटांनी एका चिमुकलीवर अत्याचार; नराधमांना कोण रोखणार?
2
पाच राज्यांच्या भविष्याचा आज फैसला; प.बंगाल, तामिळनाडूच्या निकालावर नजरा
3
पाऊस चोरणारे देश? अमेरिका-इस्रायलवर 'ढगचोरी'चा खळबळजनक आरोप; प्रकरण काय?
4
राज्यात पहिलीपासून तिसऱ्या भाषेचा मुद्दा यंदाच्या वर्षी बारगळण्याची चिन्हे; डॉ. नरेंद्र जाधव समितीच्या अहवालावर निर्णय प्रलंबित
5
आधी नराधमाला फाशी द्या, मगच या...नसरापूरच्या पीडित पित्याचा संताप, न्यायाची केली मागणी; राजकीय नेत्यांच्या गर्दीने कुटुंब व्यथित
6
पाकिस्तान, चीन सीमेवर भारताची अहोरात्र ‘दृष्टी’; ‘गॅलेक्सआय’ या भारतीय स्टार्टअपचा उपग्रह लाँच
7
एसीच्या स्फोटाने आग; दिल्लीत ९ जणांचा मृत्यू; जळालेल्या आईच्या मिठीत होता मुलाचा मृतदेह
8
परीक्षा नव्हे, बोर्डच ‘नॉमिनल’ ! निकालात उच्चांक गाठणारे बोर्ड आता का मागे पडले?
9
मिसिंग लिंकवर सेल्फीसाठी थांबलात तर होईल मोठा ताप; वाहतूक पोलिसांकडून दाेन दिवसांत ९० वाहनांवर दंडात्मक कारवाई
10
या रक्तरंजित काळात कोहिनूरची आठवण का व्हावी?
11
कामगारांचा संताप आता रस्त्यावर उतरू लागला आहे, कारण..
12
सॉल्टलँड, परप्रांतीय आणि कॉन्स्टेबलचा मृत्यू..!
13
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
14
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
15
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
16
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
17
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
18
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
19
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
20
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद विभाग झाला नापास

By admin | Updated: May 26, 2014 01:13 IST

औरंगाबाद : ‘कुटुंब लहान, सुख महान’ या जाहिरातीद्वारे लहान कुटुंबाचे महत्त्व शासनाकडून सांगितले जाते.

 औरंगाबाद : ‘कुटुंब लहान, सुख महान’ या जाहिरातीद्वारे लहान कुटुंबाचे महत्त्व शासनाकडून सांगितले जाते. दोनपेक्षा अधिक अपत्ये असलेल्या व्यक्तीस शासनाने पंचायत समिती, जिल्हा परिषद, मनपा सदस्यत्वासाठी अपात्र ठरविले आहे. एवढेच नव्हे तर नोकरीसाठीही लहान कुटुंबाला प्राधान्य देण्यात आले आहे. लोकसंख्या नियंत्रणासाठी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया अत्यंत प्रभावी साधन आहे. देशात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया हा राष्ट्रीय कार्यक्रम राबविण्यात येतो. या उपक्रमांतर्गत मिळालेले उद्दिष्ट गाठण्यात औरंगाबाद आरोग्य विभाग यावर्षी अयशस्वी ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या औरंगाबाद उपसंचालक कार्यालयांतर्गत औरंगाबाद, जालना, परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांचा समावेश आहे. शासनाने औरंगाबाद उपसंचालक विभागाला ४६ हजार ३५० कुटुंब नियोजन शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट दिले होते. या उद्दिष्टपूर्तीसाठी विभागातील जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी ते प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी, नर्सिंग स्टाफ आणि अंगणवाडीसेविका यांनी प्रयत्न केले. औरंगाबाद जिल्ह्याला १२ हजार ७५० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट देण्यात आले होते. जिल्ह्यातील अधिकार्‍यांना ११ हजार २१ शस्त्रक्रिया करता आल्या आहेत. जालना जिल्ह्याचे काम सर्वांत कमी झाले आहे. जालना जिल्ह्याला ११ हजार ३०० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी जिल्ह्यात ८ हजार ७०३ महिलांनी कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून घेतल्या. केवळ ७७ टक्के उद्दिष्ट साध्य करता आल्याचे उपसंचालक कार्यालयाकडून सांगण्यात आले. परभणी जिल्ह्याला मिळालेल्या ९ हजार ६०० शस्त्रक्रियांच्या उद्दिष्टापैकी ७ हजार ९६५ शस्त्रक्रिया करण्यात यश आले. हिंगोली जिल्ह्याने १०४ टक्के काम केल्याचे समोर आले आहे. हिंगोलीला ७ हजार ६०० शस्त्रक्रियांचे उद्दिष्ट असताना तेथील डॉक्टरांनी केलेल्या जनजागृतीमुळे ७ हजार ९०४ शस्त्रक्रिया करता आल्या. औरंगाबाद महानगरपालिकेतील डॉक्टरांचे काम विभागात सर्वोत्तम राहिले आहे. मनपा आरोग्य विभागाला ५ हजार १०० शस्त्रक्रिया करण्याचे सांगण्यात आले होते. विभागाने ५ हजार ४६१ महिलांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करून लोकसंख्या नियंत्रणाच्या राष्ट्रीय कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.पुरुष नसबंदीसंदर्भात असलेले गैरसमज आजही कायम आहेत. औरंगाबाद विभागात १ एप्रिल २०१३ ते ३१ मार्च २०१४ या कालावधीत केवळ १५६ पुरुषांनी नसबंदी शस्त्रक्रिया केली. यात सर्वाधिक ८९ शस्त्रक्रिया औरंगाबाद ग्रामीण भागात झाल्या.