शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादेत मांडूळ विक्री करणारे दोघे गजाआड; गुन्हे शाखेची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2018 14:01 IST

मांडूळ या वन्य प्राण्याची अवैधरित्या विक्री करण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी ताब्यात घेतले.

औरंगाबाद : मांडूळ या वन्य प्राण्याची अवैधरित्या विक्री करण्यास आलेल्या दोघांना गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री ७.३० च्या दरम्यान ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काळ्याबाजारात विक्रीसाठी आणलेले दोन मांडूळ हस्तगत करण्यात आले आहेत. 

या बाबत अधिक माहिती अशी कि, वाळूज पंढरपूर येथे शुक्रवारी संध्याकाळी दोघेजण मांडूळ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती गुन्हेशाखेचे पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांना खबऱ्याकडून मिळाली. यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांच्या पथकाने औरंगाबाद- अहमदनगर रोडवरील सुंदर आर्केड येथे सापळा रचला. रात्री ७.३० वाजेच्या दरम्यान दीपक मोरे व सुनील चव्हाण हे दोघे या ठिकाणी आले असता त्यांना पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून  दोन मांडूळ हस्तगत करण्यात आले. जंगलात खोदकाम करताना दोन्ही मांडूळ सापडले असून त्याची प्रत्येकी ५५ लाखाला विक्री करणार होतो अशी माहिती त्या दोघांनी दिली. 

यानंतर दोन्ही मांडूळ खुल्ताबाद वन विभागाचे एम.पी. कांबळे, ए.टी. पाटील, एस.वाय. गावंदर यांच्या सुपूर्द करण्यात आली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त यशस्वी यादव, उप आयुक्त डॉ. दिपाली धाटे - घाडगे, सहाय्यक आयुक्त रामेश्वर थोरात, पोलीस निरीक्षक शिवाजी कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसforestजंगल