शहरं
Join us  
Trending Stories
1
Hormuz Strait Crisis : तेलाची किंमत ११० डॉलरच्या पार, जगभरात घबराट! इराणने सहमती दर्शवली नाही, तर नाटो होर्मुझमध्ये प्रवेश करणार
2
'Welcome my friend' म्हणत पंतप्रधान मेलोनींनी केले स्वागत, PM मोदींनीही शेअर केले रोममधील भेटीचे फोटो
3
राज्यभरात इंधन टंचाई! बऱ्याच पेट्रोल पंपांवर पेट्रोल, डिझेल संपलेले; ट्रॅक्टर थांबले, डिझेलसाठी शेतकरी रांगेत  
4
नीट पेपरफुटीचा भांडाफोड कसा झाला? या शिक्षकाच्या लक्षात आले नसते तर...
5
गोव्यात कमी किमतीत पेट्रोल विसरा, दराने ओलांडली शंभरी; डिझेल ९० पैशांनी महाग, ताजे रेट पाहा
6
गश्मीर महाजनी 'देऊळ बंद २'मध्ये दिसणार? मोहन जोशींना म्हणाला, "स्वामींनी आदेश दिलाय तर..."
7
Vastu Shastra: बाथरूममध्ये बादली रिकामी ठेवताय? घरात दारिद्र्य आणणाऱ्या 'या' ३ चुका आजच सुधारा
8
कागोशिमा भूकंपाने जपान पुन्हा हादरले; ५.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे हादरे, प्रशासनाने जारी केला महत्त्वाचा अलर्ट!
9
मृत्यू कलिंगडामुळे नाही तर...; ४ जणांच्या मृत्यू प्रकरणात पोलिसांच्या हाती लागला खळबळजनक माहिती
10
Deepika Nagar :"रात्री साडेबाराला मोठा आवाज झाला अन्..." शेजाऱ्याने उघड केली 'त्या' रात्रीची संपूर्ण कहाणी!
11
PM Modi Donald Trump: भारताचे पंतप्रधान आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पुढच्या महिन्यात भेटणार; कोणत्या देशामध्ये होणार भेट?
12
"शुक्रवार, शनिवार किंवा रविवार..." इराणवर पुन्हा होणार मोठा हल्ला; डोनाल्ड ट्रम्प यांनी केले जाहीर
13
BRICS Summit 2026: तब्बल ७ वर्षांनंतर शी जिनपिंग भारतात येणार! दिल्लीतील ब्रिक्स परिषदेला पुतिन यांचीही उपस्थिती असणार
14
धोकादायक कुत्र्यांना मृत्यूचे इंजेक्शन द्या : सुप्रीम काेर्ट; दयामरण देण्यास प्रथमच परवानगी
15
मोटेगावकर पेपरफुटीविरोधात लढत होता, आता स्वतःच आरोपी बनला...
16
"असे १०० जाळून टाकेन...", हॉस्पिटलबाहेर फोटो काढणाऱ्या पापाराझींवर भडकला सलमान खान, दिला थेट इशारा
17
संपादकीय: बांधावर घोंगावणारे वादळ, वेळीच नाही ओळखले तर...
18
नाश्ता महागला; पाव, ब्रेडच्या किमतीत १०% वाढ
19
आजचे राशीभविष्य, २० मे २०२६: आजचा दिवस आर्थिक दृष्टया लाभदायी, पण अवैध कामासून राहावे लागेल दूर; कोणत्या राशींच्या लोकांनी घ्यावी काळजी?
20
१९ जिल्हे ४५ अंश सेल्सिअस पार, जलसाठे घटताहेत; मंत्रिमंडळ बैठकीत चिंता
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद: भाजपचा संदीपान भुमरेंना विरोध, विनोद पाटलांना समर्थन; शिंदेंसमोर मोठा पेच

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2024 23:03 IST

शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या विनोद पाटलांच्या समर्थनार्थ भाजपचे नगरसेवक एकवटले आहेत.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. एकनाथ शिंदेंच्या अनेक जागा या भाजपाच्या स्थानिक नेतृत्वाच्या विरोधामुळे पेचात अडकलेल्या आहेत. खुद्द श्रीकांत शिंदे यांची जागा फडणवीसांच्या मुखातून वदवून घ्यावी लागली आहे. अशातच महत्वाची जागा असलेली छत्रपती संभाजीनगर म्हणजेच औरंगाबादमध्ये देखील भाजपाचा विरोध सुरु झाल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. 

शिंदे गटाकडून इच्छुक असलेल्या विनोद पाटलांच्या समर्थनार्थ भाजपचे नगरसेवक एकवटले आहेत. तर या नगरसेवकांचा संदीपान भुमरे यांना विरोध असून त्यांना उमेदवारी दिली तर पुढची भूमिका आम्ही ठरवू असा इशारा माजी उपमहापौरांसह भाजपाच्या ८ नगरसेवकांनी दिले आहे. 

छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठी घडामोड समोर आली आहे. विनोद पाटील यांनी नुकतीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. या पाटलांच्या समर्थनार्थ हे नगरसेवक मैदानात उतरले आहेत. यावेळी ही जागा शिंदे गटाला जाणार असेल तर विनोद पाटलांना उमेदवारी द्यावी, अशी मागणी या नगरसेवकांनी केली आहे. भाजपचे माजी  उपमहापौर राजू शिंदे व इतर नगरसेवकांनी ही मागणी केली आहे. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाSandipan Bhumreसंदीपान भुमरेaurangabad-pcऔरंगाबाद