शहरं
Join us  
Trending Stories
1
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
2
संसदेतील महाचर्चेतच मध्यरात्री लागू झाला महिला आरक्षण कायदा २०२३; सरकारने जारी केले नोटिफिकेशन
3
नराधम अयानला पोलिसांनीच भरवला केक;'बॉस'चा टी-शर्ट घालून भररस्त्यात वाढदिवस साजरा
4
Top Marathi News LIVE Updates: मी असतो तर आरोपींना फाशी दिली असती- अमित ठाकरे
5
MI vs PBKS: मैदान मुंबईचं अन् दशहत पंजाबची! श्रेयस अय्यरच्या संघानं वानखेडेवर रचला मोठा इतिहास
6
IPL 2026: ५ सामने, ० विकेट्स! MIचा हुकूमी एक्का जसप्रीत बुमराहचा 'फ्लॉप शो'; 'हे' आहे कारण
7
नवग्रह काही वाकडं करू शकणार नाही, उलट अपार लाभ-भरभराट होईल; अक्षय्य तृतीयेला ‘हे’ दान करा!
8
कर्जात बुडालेले लोक आता घेताहेत सोन्यावर कर्ज, बुडण्याची भीती वाढली
9
सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ तेजी; पाहा २४K, २२K, १८K सोन्याचा तुमच्या शहरातील दर 
10
सांगली हादरली! पत्नीला घरात ठेवण्याच्या हट्टापायी आईची हत्या; वडील घरी नसताना मुलाचे क्रूर कृत्य
11
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
12
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
13
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
14
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
15
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला आमरसपुरीचे जेवण आणि पितरांना ठेवतात नैवेद्य; काय आहे प्रथा? वाचा 
16
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
17
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
18
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
19
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
20
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
Daily Top 2Weekly Top 5

मांडूळ सापाची तस्करी करणारी टोळी अटकेत

By admin | Updated: July 23, 2016 01:12 IST

औरंगाबाद : दुतोंड्या साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांची टोळी नाकाबंदीदरम्यान हर्सूल पोलिसांच्या हाती लागली.

औरंगाबाद : दुतोंड्या साप म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चार जणांची टोळी नाकाबंदीदरम्यान हर्सूल पोलिसांच्या हाती लागली. या टोळीकडून एक मांडूळ आणि कार हस्तगत करण्यात आली आहे. गुप्तधनाचा शोध घेण्याचे काम करणाऱ्या मांत्रिकांकडून अशा प्रकारच्या मांडूळ सापाची मागणी असते.श्रीरंग सानप (एस.टी. चालक, मुंबई आगार, मूळ रा. पाटोदा,बीड), दलाल शेख हारून (रा.जालना), कारमालक भिका पवार(रा.भारंबा तांडा, ता.कन्नड) आणि कारचालक संतोष राठोड(रा.उंबरखेड, ता. कन्नड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार गुरुवारी रात्री शहरातील सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत नाकाबंदी लावण्यात आली होती. शहरात येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जात होती. रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास हर्सूल पोलीस ठाण्याचे निरीक्षक वसीम हाशमी आणि त्यांचे सहकारी हर्सूल पोलीस चौकीसमोर वाहनांची तपासणी करीत होते. यावेळी हर्सूलकडून शहरात जाणारी तवेरा पोलिसांनी अडवली. यावेळी संतोष राठोड कार चालवीत होता तर भिका बाजूच्या सीटवर बसला होता. यावेळी पोलिसांनी कारमध्ये काय आहे आणि कोठे जात आहात, असा सवाल चालकास केला. त्यावेळी त्याने ‘मालकास विचारा’ असे उत्तर दिले. तेव्हा पोलिसांना संशय आला. पोलिसांनी आपला मोर्चा पवारकडे वळवला तेव्हा त्याने जालना येथे जात असल्याचे सांगितले. शिवाय कारमध्ये काहीही नसल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी कारची झडती घेतली असता त्या कारमध्ये एक पिशवी दिसली.या पिशवीत काय आहे, असा सवाल पोलिसांनी करताच ‘साहेब, काय दंड घ्यायचा तो घ्या आणि जाऊ द्या’ असे तो म्हणू लागला. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी त्यास पिशवी उघडायला लावली असता त्यात सुमारे चार फूट लांबीचा मांडूळ साप आढळला. त्यानंतर दोन्ही आरोपींना सापासह ताब्यात घेऊन ठाण्यात आणून चौकशी केली. त्यावेळी त्यांनी त्यांचे दोन साथीदार सिडको बसस्थानक येथे थांबलेले आहेत. त्यांना हा साप देण्यासाठी घेऊन जात असल्याचे सांगितले. त्यानंतर पोलीस त्यांना घेऊन सिडको स्थानक येथे गेले असता दलाल शेख हारून आणि बसचालक सानप यांना पकडले. यावेळी हारून याने जालना येथे काही जणांना हा साप विक्री करण्यासाठी नेत असल्याची कबुली दिली.