शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकार करणाऱ्या सुरक्षारक्षकावर हल्ला

By admin | Updated: September 5, 2014 00:50 IST

औरंगाबाद : चोरी करताना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकावर चोरट्याने हल्ला करून पळ काढला.

औरंगाबाद : चोरी करताना पकडण्याचा प्रयत्न करणाऱ्या सुरक्षारक्षकावर चोरट्याने हल्ला करून पळ काढला. चोरट्याच्या या हल्यात सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला. ही घटना रेल्वेस्टेशन औद्योगिक वसाहतीतील निर्लेप कंपनीत घडली. हे कृत्य करणाऱ्या चोरट्याची सीसीटीव्हीमुळे ओळख पटली आणि काल त्याला सातारा पोलिसांनी अटक केली.अनिल प्रभाकर गायकवाड (२५, रा. छोटामुरलीधरनगर) असे या चोरट्याचे नाव आहे. तो पोलीस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार आहे. या घटनेबाबत माहिती देताना पोलीस निरीक्षक कैलास प्रजापती यांनी सांगितले की, प्रकाश बळीराम दरवेशी हे निर्लेप कंपनीत सुरक्षारक्षक म्हणून नोकरी करतात. ३० आॅगस्ट रोजी पहाटे ते ड्युटी करीत असताना आरोपी अनिल गायकवाड हा कंपनीत चोरीसाठी घुसला. त्याने साहित्य चोरण्यास सुरुवात केली. ही बाब सुरक्षारक्षक दरवेशी यांच्या नजरेस पडली. त्यांनी या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने लोखंडी रॉडने दरवेशींवर हल्ला चढविला. या हल्यात दरवेशी जखमी झाल्यानंतर चोरट्याने तेथून धूम ठोकली. या प्रकरणी सातारा पोलीस ठाण्यात दरवेशी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंदविण्यात आला होता. दरम्यान, हा प्रकार कंपनीत लावलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला होता. त्या फुटेजवरून हा गुन्हा कुख्यात गुन्हेगार अनिल गायकवाड याने केल्याचे स्पष्ट झाले. तेव्हा जमादार सुधाकर पाटील, राजेंद्र साळुंके, देशराज मोरे यांनी शोध घेऊन काल आरोपी अनिलला अटक केली. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून त्याच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस निरीक्षक प्रजापती यांनी व्यक्त केली.