शौचालय प्रमाणपत्रांसाठी कलाकारांची धावपळ !

By Admin | Updated: December 31, 2014 01:03 IST2014-12-31T00:46:35+5:302014-12-31T01:03:12+5:30

बीड : स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी आधी स्वत: व सासूरवाडीत शौचालये बांधा असे फर्मान सीईओ नामदेव ननावरे यांनी कलावंतांना सोडले़

Artists move to toilet certificate! | शौचालय प्रमाणपत्रांसाठी कलाकारांची धावपळ !

शौचालय प्रमाणपत्रांसाठी कलाकारांची धावपळ !


बीड : स्वच्छता मोहिमेच्या जनजागृतीसाठी आधी स्वत: व सासूरवाडीत शौचालये बांधा असे फर्मान सीईओ नामदेव ननावरे यांनी कलावंतांना सोडले़ त्यामुळे कलावंतांनी आता प्रमाणपत्रांसाठी धावपळ सुरु केली आहे़
जिल्ह्यात शौचालये उभारण्यासाठी जि़प़ ने जनजागृतीवर भर दिला आहे़ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या प्रत्येक बैठकीमध्ये शौचालयाचा विषय ठरलेलाच असतो़ शौचालय जनजागृतीचे काम मानधन तत्वावर देण्यात यावे, यासाठी कलावंतांनी सीईओ ननावरे यांना साकडे घातले़ भू्रण हत्या, शिक्षण, दारुबंदी आदी सामाजिक विषयांवर यापूर्वी या कलावंतांनी ढोलकी, पेटीच्या सहाय्याने पोवाडे, पथनाट्य सादर करुन जनजागृती केलली आहे़ आता शौचालय बांधून प्रमाणपत्र घेण्यासाठी त्यांची लगबग सुरु केली आहे़
जि़प़ मध्ये आहे का शौचालय?
अखिल भारतीय शाहीर परिषदेचे जिल्हाध्यक्ष कैलास काटे यांनी जिल्हा परिषदेतील शौचालयांची दुरवस्था झालेली आहे़ जि़प़ मध्ये येणाऱ्यांसाठी प्रशासनाने स्वच्छतागृहाची सोय केली आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे़ कलावंत गरीब आहेत, त्यांच्याकडे स्वत:ची जागा नाही़ स्वत:सह सासूरवाडीत शौचालये बांधण्याची अट जाचक असल्याचे ते म्हणाले़
त्यात चूक काय?
कलावंतांना शासकीय अनुदानातून शौचालये बांधण्यास सांगणे चुकीचे आहे का? असा सवाल सीईओ नामदेव ननावरे यांनी उपस्थित केला़ जनजागृती करणाऱ्यांकडेच शौचालये नसतील तर चुकीचा संदेश जाईल़ त्यामुळे त्यांना शौचालये बांधणे बंधनकारक केल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले़(प्रतिनिधी)

Web Title: Artists move to toilet certificate!