शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? मोदी सरकारनं दिले मोठे संकेत!
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
4
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
5
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
6
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
7
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
8
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
9
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
10
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
11
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
12
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
13
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
14
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
15
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
16
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
17
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
20
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
Daily Top 2Weekly Top 5

नगुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक

By admin | Updated: June 19, 2014 00:17 IST

परभणी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१४ चा निकाल नुकताच घोषित झाला असून जिल्ह्यातील विविध विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.

्परभणी : माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च २०१४ चा निकाल नुकताच घोषित झाला असून जिल्ह्यातील विविध विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.
संत तुकाराम विद्यालय, धानोरा बु.
जिंतूर तालुक्यातील धानोरा येथील संत तुकाराम विद्यालयाचा दहावीचा निकाल ८८.६२ टक्के एवढा लागला आहे. परीक्षेमध्ये १६७ विद्यार्थ्यांपैकी १४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातून आकाश बोराडे, देवानंद शिंदे, श्रीराम मोरे हे विद्यार्थी प्रथम आले आहेत. तर श्रीराम मोरे द्वितीय, पल्लवी गीते तृतीय आली आहे. संस्थाध्यक्ष भगवानराव वटाणे, दोडके यांनी कौतुक केले आहे.
शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालय, वर्णा
जिंतूर तालुक्यातील वर्णा येथील श्रीमती शकुंतलाबाई बोर्डीकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९० टक्के लागला आहे. विद्यालयातून रामेश्वर अंभुरे, पूजा अंभुरे हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम व द्वितीय आले आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा मीनाताई बोर्डीकर, आ. रामप्रसाद बोर्डीकर, मुख्याध्यापक मुंजाभाऊ अंभुरे, वाकळे, रोडे, ठोंबरे, मेहेत्रे, भोडवे, रासवे आदींनी कौतुक केले आहे.
हरिबाई वरपूडकर विद्यालय, पेडगाव
कै. हरिाबाई वरपूडकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ७० टक्के लागला आहे. विद्यालयातून आकाश देशमुख, सचिन शेळके, गणेश ढेंबरे हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत.
भारत भारती विद्यालय, परभणी
भारत भारती विद्यालयाचा दहावीचा निकाल ९२.७२ टक्के लागला आहे. विद्यालयातून गणेश कानडे, संदीप करवर, अशोक यादव, मुंजा गोरे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.
बोबडे पाटील विद्यालय, झरी
कै. बाबारावजी बोबडे पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८० टक्के लागला आहे. विद्यालयातून नारायण अबदागीरे हा प्रथम आला आहे. तर नंदा तिथे, माणिक राऊत, बावरी मुकेशसिंग रुपसिंग, योगेश पांचाळ, आकाश गिरी हे विद्यार्थी प्रथमश्रेणीमध्ये आले आहेत. या यशाबद्दल संस्थाध्यक्ष संतोष बोबडे, मुख्याध्यापक बालासाहेब कदम, प्राचार्य बाळासाहेब देवकर आदींनी कौतुक केले आहे.
राजे संभाजी विद्यालय, तरोडा
राजे संभाजी विद्यालयाचा दहावीचा निकाल ९४.०० टक्के लागला आहे. विद्यालयातून प्रमिला शेळके हिने ८९.६४ टक्के गुण घेऊन विद्यालयातून प्रथम येण्याचा मान मिळविला. तर पूजा शेळके, कविता शेळके या विद्यार्थिनीने द्वितीय व तृतीय आल्या आहेत. यशस्वी विद्यार्थ्यांचा खा. बंडू जाधव, संस्थाध्यक्ष उदय देशमुख, मुख्याध्यापक दिगंबर मोरे यांनी कौतुक केले आहे. (प्रतिनिधी)
रावसाहेब जामकर विद्यालय
कै. रावसाहेब जामकर विद्यालयाचा दहावीचा निकाल ९६.३३ टक्के लागाल आहे. विद्यालयातून प्रताप जाधव (९५.४०), नम्रता गोरे (९५.२०), अशिष नाईक (९३.२०) हे विद्यार्थी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय आले आहेत. तसेच प्रथम श्रेणीमध्ये प्रणिता मंमोड (९३.००), दत्ता मिठे (९२.६०), रोहित नन्हेर (९२.४०), प्राजक्ता देशमुख (९१.८०), अशिष हुंबरे (९१.४०), सुचिता हेलसकर (९१.४०), अनुराधा सांगळे (९१.२०), निकीता पवार (९१.२०), योगेश भोग (९१.००), अजय सामाले (९०.८०), वैष्णवी चरके (९०.८०), प्रसाद कदम (९०.४०) या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे अध्यक्ष हेमंत जामकर, अ‍ॅड. किरण सुभेदार, विजयसिंह जामकर, अ‍ॅड. बाळासाहेब जामकर, डॉ. संजय टाकळकर, डॉ. अभय सुभेदार, अ‍ॅड. मंगेश सुभेदार, संग्राम जामकर, प्राचार्य सुदाम लाड, उपमुख्याध्यापक डी.डी. हिप्पळगावकर आदींनी कौतुक केले आहे.