संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी

By Admin | Updated: August 31, 2015 13:21 IST2015-08-31T13:21:01+5:302015-08-31T13:21:02+5:30

जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघही सहभागी होणार आहे.

Anganwadi workers participating in the collapse | संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी

संपात अंगणवाडी कर्मचारी सहभागी

 नांदेड: जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या विविध मागण्यांसाठी २ सप्टेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या देशव्यापी संपात राज्य अंगणवाडी कर्मचारी संघही सहभागी होणार आहे.
वेतनश्रेणी लागू करावी, मिनी अंगणवाडी सेविकांना अंगणवाडी सेविकांचे सर्व लाभ देण्यात यावे, आदी मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी संघ देशव्यापी संपात सहभागी होत असल्याची माहिती जिल्हाध्यक्षा शततारका काटकाडे यांनी दिली. संपात सहभागी होण्याचे आवाहन कार्याध्यक्षा मंगलाताई सराफ, सचिव नंदकुमार देशमुख, अश्‍विनी महल्ले, वर्षा गवारे, कुशवार्ता पांचाळ, सुरेखा सावंत आदींनी केले./(प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi workers participating in the collapse