अंगणवाडी सेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल

By Admin | Updated: August 10, 2015 00:58 IST2015-08-10T00:38:18+5:302015-08-10T00:58:46+5:30

बीड : पाटोदा येथील एका अंगणवाडीतील मातीने भरलेली रोप असलेली कुंडी बालकाच्या डोक्यात पडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता.

Anganwadi worker filed a complaint with four | अंगणवाडी सेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल

अंगणवाडी सेविकेसह चौघांवर गुन्हा दाखल


बीड : पाटोदा येथील एका अंगणवाडीतील मातीने भरलेली रोप असलेली कुंडी बालकाच्या डोक्यात पडून पाच वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी पाटोदा ठाण्यात अंगणवाडी सेविकसेह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाटोदा शहरातील मांजरसुंबा रोडवरील डिजीटल अंगणवाडी आहे. या अंगणवाडीमध्ये मातीने भरलेली रोप असलेली कुंडी उंचीवर ठेवण्यात आली होती. दरम्यान, २५ जुलै रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास, अंगणवाडीमध्ये कार्तीक अजीत गोरे हा खेळत असताना त्याच्या डोक्यात अधिक उंचीवर ठेवलेली कुंडी त्याच्या डोक्यात पडली. यामुळे तो गंभीर जखमी झाला. औरंगाबाद येथील रूग्णालयात उपचार सुरू असताना या बालकाचा मृत्यू झाला.
याप्रकरणी अजीत अशोक गोरे यांच्या फिर्यादीवरुन सीबीपीओ स्वामी, सुपरवाईजर रर्जे, कदम, सुनीता या अर्धवट नावासह पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Anganwadi worker filed a complaint with four