शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

वºहाडीच्या नावाखाली अवैध वाहतूक

By admin | Updated: May 23, 2014 00:16 IST

वडवणी: सध्या लग्नाचा धुमधडाका सर्वत्र सुरू असून, लग्नाच्या वºहाडाच्या नावाखाली तालुक्यात सर्वत्र खाजगी वाहनांकडून अवैध वाहतूक केली जात आहे.

 वडवणी: सध्या लग्नाचा धुमधडाका सर्वत्र सुरू असून, लग्नाच्या वºहाडाच्या नावाखाली तालुक्यात सर्वत्र खाजगी वाहनांकडून अवैध वाहतूक केली जात आहे. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. या अवैध वाहतुकीला आळा बसविण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशी मागणी सुजाण नागरिकांतून केली जात आहे. सध्या लग्नाचा मोसम धुमधडाक्यात सुरु आहे. ग्रामीण भागातील वºहाडींना लग्नाच्या ठिकाणी घेऊन जाण्यासाठी अवैध वाहतूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे. टेम्पो, ट्रकसह जीपचाही मोठ्या प्रमाणात वºहाडी घेऊन जाण्यासाठी वापर केला जात आहे. तर काही ठिकाणी वºहाडी घेऊन जाण्याच्या नावाखाली सर्रास अवैध वाहतूक केली जात आहे. या वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून कुठलेही पाऊल उचलले जात नसल्याने हे खाजगी वाहनधारक मोठ्या प्रमाणात वाहतूक करू लागले आहेत. तालुक्यातील कुप्पा, चिंचाळा, दुकडेगाव, परडी माटेगाव या भागात याचे अधिक प्रमाण दिसून येत आहे. वडवणी शहरातील तेलगाव रोड, बीड रोड, साळिंबा रोड, चिंचवण रोड या भागात खाजगी वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जात असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबत काही पोलीस कर्मचारी या वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांना लग्नाचे वºहाडी मंडळी घेऊन जात असल्याचे कारण सांगत आपली सुटका करुन घेत असल्याचे काही खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. पोलिसांची फसवणूक करुन वºहाडीच्या नावाखाली अवैध वाहतूक करणार्‍या खाजगी वाहनांवर कठोर कारवाई करावी व होणारे अपघात टाळावेत, अशी मागणी सुजाण नागरिकांसह प्रवाशांमधून केली जात आहे. याबाबत वडवणीचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष साबळे म्हणाले, कुठलाही खाजगी वाहनधारक क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन जात असल्याचे आमच्या निदर्शनास आल्यास आम्ही त्यांच्यावर कठोर कारवाई करू. प्रत्येक चौकासह महामार्गावर आमचा ‘वॉच’ असणार आहे. अपघात टाळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. (वार्ताहर)